Ola Electric Scooters Sale: केंद्र सरकारने अनुदानात कपात केल्यानंतरही ओला इलेक्ट्रिकने जास्तीत जास्त इलेक्ट्रिक स्कूटी विकून दुचाकी बाजारात आपला दबदबा कायम ठेवला आहे. 1 जूनपासून केंद्र सरकारने इलेक्ट्रिक टू व्हीलरवरील सबसिडी कमी केली, त्यानंतर इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या किंमतीत वाढ झाली. इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या किंमतीत वाढ झाल्याचा परिणाम जून महिन्यात दुचाकी उत्पादक कंपन्यांच्या विक्रीवर दिसून आला आहे. यानंतरही ओला इलेक्ट्रिकने जास्तीत जास्त इलेक्ट्रिक स्कूटी विकून दुचाकी बाजारात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.ओला इलेक्ट्रिकने जून 2023 मध्ये 18000 हून अधिक स्कूटी विकल्या आहेत.
Table of contents [Show]
जून महिन्यातील विक्री
एप्रिल आणि मे महिन्यातही आपल्या विक्रीचा दबदबा कायम ठेवणाऱ्या ओला इलेक्ट्रिक स्कूटर्सची जून 2023 मध्ये मार्केटमध्ये सर्वाधिक विक्री झाली. जून मध्ये कंपनीने 18000 युनिट्सची विक्री केली. यापूर्वी मे महिन्यात ओला कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटीच्या 28617 युनिट्सची विक्री केली होती.
ओला प्रथम क्रमांकावर
FAME II (Faster Adoption and Manufacturing of Electric Vehicles in India) योजना या वर्षी मे महिन्यात लागू नव्हती. त्यामुळे महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर स्कूटीच्या विक्रीतील वाढ 40% कमी झाली आहे. तर जून 2022 मध्ये ओला इलेक्ट्रिकने 5898 स्कूटी विकल्या होत्या. त्यामुळे वर्ष-दर-वर्ष आधारावर ओला इलेक्ट्रिकच्या विक्रीत 200% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
TVS दुसऱ्या क्रमांकावर
जून महिन्यात इलेक्ट्रीक स्कूटी विक्रीच्या बाबतीत TVS दुसऱ्या क्रमांकावर आहे. TVS ने जून महिन्यामध्ये ई स्कूटीच्या एकूण 5253 युनिट्सची विक्री केली आहे. मे 2023 मध्ये कंपनीने एकूण 20396 युनिट्सची विक्री केली होती. महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर,TVS स्कूटीची विकासामध्ये सुमारे 74 टक्के घट झाली आहे. तर जून 2022 मध्ये, TVS कंपनीने एकूण 1980 इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या.
एथर तिसऱ्या क्रमांकावर
जून महिन्यात इलेक्ट्रीक स्कूटी विक्रीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर ई-स्कूटी कंपनी एथर आहे. जून 2023 मध्ये,एथरने एकूण 3422 युनिट्स विकल्या, तर मे 2023 मध्ये, कंपनीने एकूण 15404 युनिट्स विकल्या आहेत.