वर्ष 2023 मध्ये मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार एकूण 15 दिवस बंद राहणार आहे. तर करन्सी डेरिव्हेटिव्हज विभाग 19 दिवस बंद राहणार आहे. एप्रिल 2023 मध्ये शेअर मार्केट सर्वाधिक तीन दिवस बाजाराचे कामकाज बंद राहणार आहे.
शेअर बाजाराच्या माहितीनुसार BSE आणि NSE ला वर्ष 2023 मध्ये 15 दिवस बंद राहतील. यातील सहा दिवस अतिरिक्त सुटट्या (Extended Holidays) आहेत. वर्ष 2022 मध्ये 13 सार्वजनिक सुट्ट्या होत्या तर 4 अतिरिक्त दिवस शेअर मार्केट बंद होते.
2023 या वर्षातील पहिला हॉलिडे 26 जानेवारी 2023 रोजी आहे.त्यानंतर एप्रिल महिन्यात तीन दिवस बाजार सार्वजनिक सुट्ट्यांमुळे बंद राहील. 4 एप्रिल 2023 रोजी महावीर जयंतीनिमित्त दोन्ही शेअर बाजार बंद राहतील. 7 एप्रिल रोजी गुड फ्रायडे आणि 14 एप्रिल 2023 रोजी भारतरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर जयंती निमित्त शेअर बीएसई आणि एनएसई बाजार बंद राहतील. 1 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजारांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दोन्ही शेअर मार्केट 2 ऑक्टोबर 2023 रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त बंद राहतील. 27 नोव्हेंबर 2023 रोजी गुरुनानक जयंती निमित्त आणि 25 डिसेंबर रोजी नाताळ निमित्त दोन्ही शेअर बाजारांना सुट्टी असेल. फेब्रुवारी आणि जुलै महिन्यात शेअर बाजाराचे पूर्णवेळ कामकाज राहील.
12 नोव्हेंबर 2023 रोजी मुहूर्ताचे सौदे
वर्ष 2023 मध्ये शेअर मार्केटमध्ये मुहूर्ताचे सौदे 12 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे. 12 नोव्हेंबर रोजी कोणत्या वेळेत मुहूर्ताचे सौदे होणार हे शेअर बाजारांकडून लवकरच जाहीर केला जाणार आहे. 2022 मध्ये 24 ऑक्टोबर रोजी मुहूर्ताचे सौदे पार पडले होते. करन्सी डेरिव्हेटीव्हजमध्ये (चलनांचा वायदे बाजार) वर्ष 2023 मध्ये 19 दिवस बंद राहणार आहे. गुढी पाडवा, बुद्ध पौर्णिमा, ईद ए मिलाद आणि पारशी नववर्ष अशा चार सार्वजनिक सुट्ट्या करन्सी डेरिव्हेटीव्हज मार्केटला आहेत.