Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NSDL IPO: देशातील पहिली डिपॉझीटरी संस्था NSDL 2023मध्ये आयपीओ आणण्याच्या तयारीत!

NSDL IPO 2023

NSDL IPO: नॅशनल सिक्युरिटी डिपॉझीटरी लिमिटेड (National Security Depository Limited-NSDL) ही संस्था सरकारमान्य शेअर डिपॉझीटरी आहे. शेअर डिपॉझीटरी हे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये शेअर होल्ड करतात.

NSDL IPO: एनएसडीएल, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझटरी लिमिटेड (NSDL), देशातील पहिली डिपॉझीटरी संस्था; 2023 मध्ये आयापीओ आणण्याच्या तयारीत आहे. एलएसडीएल ही गुंतवणूकदारांचे शेअर्स डिजिटली होल्ड करण्याचे आणि शेअर्स ट्रान्सफर करण्याची सेवा पुरवते.

NSDL चा आयपीओ साईज काय असेल?

NSDLच्या आयपीओची साईज अजून कंपनीकडून जाहीर करण्यात आलेली नाही. पण कंपनीने या आयपीओमधून सुमारे 2500 ते 3000 कोटी रुपये उभारण्याचा मानस आखला आहे. कंपनी 2023 मधील फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात इश्यूसाठी पेपर जमा करण्याची शक्यता आहे.

एनएसडीएलमध्ये IDBI Bank आणि NSE (National Stock Exchange) पैसे गुंतवणार आहे. NSDL या आयपीओ गुंतवणुकीसाठी ICICI Securities, Axis Capital, HSBC Securities, मोतीलाल ओसवाल इन्वेस्टमेंट अडवायझर्स, एसबीआय कॅपिटल, एचडीएफसी बॅंक आणि आयडीबीआय कॅपिटल या बॅंकांची निवड होऊ शकते. NSDL आयपीओ आणणार असल्याची चर्चा गेल्या आठवड्यापासून सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, याचे सगळे इश्यू ऑफर फॉर सेल (Offer for Sale)साठी असतील. तसेच यादरम्यान, IDBI Bank आणि NSE आपल्या हिश्श्यातील भाग विकू शकते.

NSDL काय आहे?

नॅशनल सिक्युरिटी डिपॉझीटरी लिमिटेड (National Security Depository Limited-NSDL) ही संस्था सरकारमान्य शेअर डिपॉझीटरी आहे. शेअर डिपॉझीटरी हे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये शेअर होल्ड करतात. पूर्वी प्रत्यक्ष म्हणजे ऑफलाईन शेअर्सची खरेदी-विक्री होत होती. तेव्हा शेअर्स पेपर सर्टिफिकेटद्वारे घेतले जायचे. आता हेच शेअर्स डिजिटल फॉर्ममध्ये होल्ड किंवा खरेदी-विक्री केले जातात. ते डिजिटली ठेवण्याचे काम NSDL करते.

एनएसडीएलची स्थापना कधी झाली?

8 ऑगस्ट, 1996 मध्ये NSDL ची स्थापना करण्यात आली. ही देशातील पहिली राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक डिपॉझिटरी आहे. भारतीय शेअर मार्केटचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टिने त्याची स्थापना करण्यात आली होती.

एनएसडील कोणकोणती सेवा पुरवते?

  • डिमॅट अकाउंटची देखभाल करणे आणि ते सुरक्षित ठेवणे
  • खरेदी केलेले शेअर्स सुरक्षित ठेवणे
  • ट्रेड सेटलमेंट सुरक्षित ठेवणे
  • शेअर्स ट्रान्सफरचा रेकॉर्ड ठेवणे 
  • ग्राहकांना डिमॅट अकाउंट ओपन करण्याची मदत करणे
  • ग्राहकाच्या मागणीनुसार अकाउंट डिटेल बदलणे

केंद्र सरकारचा एनएसडीएलमध्ये 6.83 टक्के वाटा!

30 जून, 2022 पर्यंत NSDLमध्ये आयडीबीआय बॅंकेचा एकूण 26.1 टक्के आणि एनएसईचा 24 टक्के हिस्सा होता. तर दुसरे शेअरहोल्डर HDFC Bank जवळ 9.95 टक्के SBI कडे 5 टक्के, डॉएश बॅंकेकडे 5 टक्के हिस्सा आहे. याशिवाय HSBC आणि Standard Chartered बॅंकेकडे 3.13 टक्के भागदारी आहे. NSDLमध्ये केंद्र सरकारचाही स्पेसिफाईड्स अंडरटेकिंग ऑफ द युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (SUUTI) च्या अंतर्गत 6.83 टक्के भागीदारी आहे.