डिजिटल व्हिडिओ निर्मात्यांसाठी यूट्यूब (YouTube) वरदान ठरले आहे. गेल्या काही वर्षांत हजारो आणि लाखो लोकांनी यूट्यूब (YouTube) व्हिडिओ बनवून भरपूर कमाई केली आहे. आता छोट्या व्हिडिओंचा ट्रेंडही वाढत आहे. यामुळेच यूट्यूब (YouTube) ने शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म शॉट्सवरही कमाई करण्याची घोषणा केली आहे. हा प्रोग्राम 1 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहे.
छोट्या व्हिडिओंमध्येही दिसणार जाहिराती
यूट्यूबची मूळ कंपनी गुगलने नुकतेच आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले आहे की, आता जाहिराती छोट्या व्हिडिओंमध्येही चालतील आणि निर्मात्यांनाही त्यातून पैसे मिळतील. यासाठी कंटेंट क्रिएटर्सना यूट्यूबसोबत नवीन करार करावा लागेल. कंटेंट क्रिएटर्सना त्यांच्या लहान व्हिडिओंमधून पैसे कमवायचे आहेत की नाही? हे सांगावे लागणार आहे.
तर एक पैसाही मिळणार नाही
शॉर्ट्स कमाई करण्यासाठी, शॉर्ट्स कमाई मॉड्यूल (Shorts Monetization Mudule) स्वीकारावे लागेल. यामध्ये सर्व अटी व शर्ती देण्यात आल्या आहेत. हे 1 फेब्रुवारी 2023 नंतर करावे लागेल. ज्या तारखेला तुम्ही या अटी मान्य कराल, त्याच दिवशी तुमचे पैसे मिळणे सुरू होईल. जे कंटेंट क्रिएटर्स 1 फेब्रुवारी ते 10 जुलै दरम्यान या अटी स्वीकारणार नाहीत ते मॉनेटायझेशन प्रोग्रामच्या बाहेर असतील आणि त्यासाठी पुन्हा अर्ज करू शकणार नाहीत.
या आहेत अटी
आतापर्यंत यूट्यूबवर कमाई करण्यासाठी दोन मुख्य अटी होत्या. तुमच्या चॅनेलवरील सदस्यांची संख्या किमान 1,000 असावी. तसेच, गेल्या 12 महिन्यांत तुमच्या चॅनेलवरील पाहण्याचे तास 4,000 तास असावेत. त्यात आता शॉर्ट्ससाठी आणखी एक अट घालण्यात आली आहे. शॉर्ट्स मॉनेटायझेशन प्रोग्रामसाठी अर्ज करण्यासाठी गेल्या 90 दिवसांत तुमच्या शॉर्ट्सवर 10 दशलक्ष व्हयूज असणे आवश्यक आहे. शॉर्ट्सची दर्शक संख्या 4,000 तासांच्या वॉच तासांमध्ये जोडली जाणार नाही.