इलेक्ट्रिक गॅझेट निर्मितीतील आघाडीची कंपनी नॉइजने महिलांसाठी खास NoiseFit Diva ही स्मार्ट वॉच सिरिज लाँच केली आहे. या घड्याळाची डायल मेटॅलिक आणि गोल्डन रंगात असल्याने त्यांना एक वेगळाच लूक आहे. गुगल असिस्टंट, अॅमलोड डिस्प्लेसह इतर अनेक महिलांसाठीची हेल्थ फिचर्स या घड्याळात आहेत. तसेच या स्मार्ट वॉचची किंमतही अगदी परवडणारी आहे.
नॉइज कंपनीने यंग आणि वर्किंग वूमन्सला ध्यानात घेऊन NoiseFit Diva उत्पादनाची निर्मिती केली आहे. घड्याळाला अँटिक लूक देताना बारीक गोष्टींवर लक्ष देण्यात आले आहे. डायमंड कट मेटॅलिक डायलमुळे इतर स्मार्टवॉचपेक्षा हे घड्याळ उठून दिसते.
NoiseFit Diva स्मार्ट वॉचमधील फिचर्स
ब्लूटूथ कॉलिंग आणि नॉइज बझ
कॉल लॉग अॅक्सेस सह 10 फोन नंबर घड्याळात सेव्ह करता येतील.
हाय रिझॉल्यूशन अॅमलोड डिस्प्ले, अॅपल सिरी आणि गुगल व्हॉइस असिस्टंट
ऑक्सिजन(SpO2), स्लीप आणि स्ट्रेस मॉनिटरींग, पिरियड ट्रॅकर (Female cycle)
चार दिवस पुरेल एवढी बॅटरी क्षमता, 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स आणि वॉच फेस मोड
यासह इतरही काही अपडेटेड स्टाइल आणि प्रोडक्टिव्हिटी फिचर्स आहेत.
वॉटर रेझिस्टंट, नॉइज फिट App ची कनेक्टिव्हिटी
घड्याळाची किंमत किती?
NoiseFit Diva या स्मार्ट वॉचची किंमत 2,999 रुपये आहे. हे वॉच नॉइज च्या संकेतस्थळावर आणि अॅमेझॉनवर एक्सक्लूझिव मिळेल. घड्याळातील फिचर्स आणि डिझाइन पाहता दर परवडणारे असल्याचे कंपनीने म्हटले आहे.