ओला (Ola) ही एक लोकप्रिय कॅब सर्व्हिस (Cab service) आहे. आपण कोठेही असू, आहे त्या ठिकाणाहून कॅब बुक करण्याची सुविधा ओलाकडून मिळत असते. मात्र यात राइड कॅन्सल होण्याचे अनुभवही अनेकांना येत असतात. चालक (Driver) उपलब्ध नसल्याचं कारण देऊन राइड कॅन्सल केली जात होती. आता मात्र शेवटच्या क्षणी कॅब ड्रायव्हर नसल्यामुळे राइड रद्द होणार नाही. ओलानं अशा काही सेवा आणल्या आहेत, ज्यामुळे रायडर तुम्हाला शेवटच्या क्षणी सेवा नाकारू शकणार नाही.
Table of contents [Show]
राइड कॅन्सलची कारणं
ओला कॅबमुळे राइडचा अनुभव बदलला आहे. घरबसल्या कॅब बुक करता येत असल्यानं वेळेची बचत होते. प्रवास आरामदायी झालाय. त्यामुळे सहाजिकच ओलाला अनेकांची पसंती असते. मात्र अनेकांना मोठ्या समस्यांनाही सामोरं जावं लागतं. विशेषत: ज्यावेळी तत्काळ कुठेतरी जायचं असतं, अशावेळी ओला बुक केल्यानंतरही ती वेळेत आपल्यापर्यंत येत नाही. वारंवार प्रयत्न केल्यानंतरही चालक उपलब्ध नसल्याचं सांगितलं जातं. किंवा खराब हवामान हेही आणखी एक कारण ऐकायला मिळत असतं.
प्राइम प्लसचा ऑप्शन
प्रवाशांना होणारी ही गैरसोय आता ओलानं सोडवलीय. ओला प्राइम प्लस नावाची एक नवीन प्रीमियम सेवा कंपनीमार्फत सुरू करण्यात येणार आहे. अद्याप ही सेवा चाचणीच्या टप्प्यामध्ये आहे. जेव्हा एखादा यूझर प्राइम प्लसच्या ऑप्शनद्वारे कॅब बुक करेल, तेव्हा त्याला 'टॉप ड्रायव्हर' नो कॅन्सल यासारख्या सुविधा मिळणार आहेत. नेमकी ही नवीन सेवा कशी काम करणार आहे, याविषयी थोडक्यात जाणून घेऊ...
बेंगळुरूमधल्या काही यूझर्ससाठीच उपलब्ध
ओला प्राइम प्लस (Ola Prime Plus) ही सेवा सध्या बेंगळुरूमधल्या काही यूझर्ससाठीच उपलब्ध करून देण्यात आलीय. चाचणीच्या स्वरुपात ती असणार आहे. देशभरात आणण्यापूर्वी या माध्यमातून कंपनीला त्याचा प्रतिसाद पाहता येणार आहे. अर्थातच हा प्रयोग यशस्वी झाल्यात कंपनीतर्फे तो सर्वत्र लागू केला जाणार आहे. ओलाचे सह-संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट करून या नव्या सेवेची माहिती यूझर्सना दिलीय. ओलानं कॅबच्या माध्यमातून नव्या प्रीमियम सेवेची चाचणी सुरू केलीय. हे प्राइम प्लस बेस्ट ड्रायव्हर्स, टॉप कार्स, कोणत्याही रद्द किंवा ऑपरेशनचे प्रॉब्लेम्स दूर करतील. सध्या ही सेवा बंगळुरूमधल्या निवडकांसाठी असणार आहे. ही सेवा नक्की वापरून पाहा. या सेवेचा लाभ घेणारे आपला अनुभव याठिकाणी ट्विटरवर शेअर करतील, असं अग्रवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
Testing out a new premium service by @Olacabs!
— Bhavish Aggarwal (@bhash) May 28, 2023
Prime Plus: Best drivers, top cars, no cancellations or operational hassles. Will go live for select customers in Bangalore today. Do try it out ???
I’ll be using it frequently and will share my experiences here on Twitter. pic.twitter.com/c8YDDgnbPU
स्क्रीनशॉटही केला शेअर
अग्रवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये एक स्क्रीनशॉटदेखील दिलाय. ओला अॅपद्वारे राइड बुक करताना प्राइम प्लस निवडण्याचा नवा पर्याय त्यांनी दाखवलाय. विशेष म्हणजे, स्क्रीनशॉटनुसार, प्राइम प्लसच्या माध्यमातून प्रवासासाठी कॅब बुक करण्याची किंमत 455 रुपये इतकी होती. तर मिनी कॅब बुक करण्यासाठी त्याच राइडची किंमत जवळपास 535 रुपये इतकी ठेवण्यात आली होती. ओला कॅब बुक करणाऱ्यांसाठी खरं तर मिनी हा सर्वात स्वस्त पर्याय असतो. मात्र प्राइम प्लसच्या पर्यायात हा दर 500 रुपयांहूनही अधिक आहे. आता यूझर जे प्राइम प्लसकडे वळणार असतील, ते याला कसा प्रतिसाद देतात, हे पाहावं लागणार आहे.