Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Electronic Gold Receipt: ई-गोल्ड रिसीटवर कॅपिटल गेन टॅक्स लागणार नाही; पण ई-गोल्ड रिसीट आहे काय?

Electronic Gold Receipt

What is Electronic Gold Receipt: EGR म्हणजे स्टॉक एक्स्चेंजवर व्यवहार केलेल्या सोन्याच्या डिपॉझिटरी पावत्या (Gold Receipts). या फॉरमॅट अंतर्गत, गुंतवणूकदार प्रत्यक्ष सोने हा धातू खरेदी न करता, अभौतिक स्वरूपात सोने खरेदी करतात आणि त्यांना प्रत्यक्ष सोने या भौतिक धातूऐवजी सोन्याच्या पावत्या दिल्या जातात.

Electronic Gold Receipt:1 फेब्रुवारी 2023 रोजी, 2023-24 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅपिटल गेन टॅक्स (Capital Gains Tax) संबंधी मोठी घोषणा केली. त्यांनी इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी, प्रत्यक्ष सोन्याचे इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (EGR - Electronic Gold Receipt) आणि EGR चे सोन्याच्या धातूमध्ये परस्पर-रूपांतरण यापुढे हस्तांतरण (transfer) मानले जाणार नाही, असे सांगत या रूपांतरणावर कोणताही भांडवली नफा कर लागणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे सोन्याच्या एकूणच इलेक्ट्रॉनिक समतुल्य गुंतवणुकीला चालना मिळण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट काय आहे, ते समजून घेऊ.

इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट काय आहे?

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सोन्याचे प्रतिनिधित्व करणारी उपकरणे इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स (EGRs) म्हणून ओळखली जातात. सध्या भारतात उपलब्ध असलेल्या इतर सिक्युरिटीज प्रमाणेच ट्रेडिंग, क्लिअरिंग आणि सेटलमेंट आदी वैशिष्ट्य असलेली प्रोडक्ट्स सिक्युरिटीज म्हणून अधिसूचित केली जातात.

अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, EGR म्हणजे स्टॉक एक्स्चेंजवर व्यवहार केलेल्या सोन्याच्या डिपॉझिटरी पावत्या (Gold Receipts). या फॉरमॅट अंतर्गत, गुंतवणूकदार प्रत्यक्ष सोने हा धातू खरेदी न करता, अभौतिक स्वरूपात सोने खरेदी करतात आणि त्यांना प्रत्यक्ष सोने या भौतिक धातूऐवजी सोन्याच्या पावत्या दिल्या जातात. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज हे पहिले स्टॉक एक्स्चेंज आहे, ज्याच्या ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर EGR लाँच केले गेले होते.

सोन्याच्या धातुचे इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्समध्ये रूपांतर कसे होते?

सोने ठेवीदार (Gold Depositor) आपल्याकडील सोने तिजोरीत (Vault) ठेवतो. व्हॉल्ट मॅनेजर ते सोने जमा केल्यानंतर त्या सोन्याचे मूल्यांकन (Valuation) करतो आणि त्यानुसार EGR तयार करतो. EGR ठेवीदारांच्या डिमॅट खात्यात (डिपॉझिटरीज) जमा केला जातो आणि त्यांनतर स्टॉक-एक्सचेंजवर सोन्याचा ऑनलाईन व्यापार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील सोने उपलब्ध होते.

EGR असण्याचे फायदे काय आहेत?

  • सोने इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्याने ऑनलाईन बुलियन ट्रेडिंगसाठी इलेक्ट्रॉनिक, प्रभावी आणि पारदर्शक प्लॅटफॉर्म उपलब्ध असतो
  • सोन्याचे मानकीकरण (standardization) आणि गुणवत्तेची खात्री निश्चित करता येते. त्यानुसार अचूक किंमत ठरवता येते.
  • सोन्याच्या कार्यक्षम वितरण शक्य होते  आणि गुंतवणूकदारांना सेटलमेंटची हमी देता येणे शक्य होते


इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स, सोने या प्रीमियम धातूची प्रभावी आणि पारदर्शक किंमत निश्चित करते. सेबी (SEBI) ने BSE ला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (EGR) सुरू करण्याची परवानगी दिली होती. सोन्याचे इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग 1 ग्रॅमच्या पटीत असते आणि वितरण 10 ग्रॅम आणि 100 ग्रॅमच्या पटीत असते. EGR द्वारे सोन्याची खरेदी-विक्री इतर शेअर्सप्रमाणेच शक्य असते. त्यासाठी तुमच्याकडे डिमॅट अकाउंट असणे आवश्यक आहे. गुंतवणूकदाराने खरेदी केलेले डिजिटल गोल्ड त्याच्या डिमॅट अकाउंटमध्ये जमा केले जाईल. सध्या भारतात फक्त Gold Derivatives आणि Gold ETF (exchange-traded fund) चा व्यापार होतो.


केंद्रीय अर्थसंकल्प 2023-2024 अंतर्गत प्रस्तावित सुचनेनुसार, SEBI नोंदणीकृत व्हॉल्ट मॅनेजरद्वारे EGR मध्ये सोन्याच्या भौतिक स्वरूपाचे आणि भौतिक सोन्याचे EGR मध्ये केलेले रूपांतर भांडवली नफ्याच्या उद्देशाने 'हस्तांतरण'च्या कक्षेतून  वगळण्याचा प्रस्ताव आहे. तसेच असेही प्रस्तावित आहे की, भांडवली नफ्याच्या गणनेच्या उद्देशाने, EGR च्या संपादनाची किंमत (cost of acquisition of EGR) ही ज्या व्यक्तीच्या नावावर इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स इश्यू केल्या गेल्या आहेत. त्याच्या हातातील सोन्याची किंमत मानली जाईल आणि ज्या कालावधीसाठी त्या गुंतवणूकदाराने सोने EGR मध्ये रूपांतरित होण्यापूर्वी ठेवले होते, तो कालावधी भांडवली नफ्याचा उद्देशासाठीचा होल्डिंग पिरिएड समजला जाईल. अशीच तरतूद  सोन्याचे EGR मध्ये रूपांतर करीत असताना देखील प्रस्तावित आहे.

अर्थात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, या सुधारणा 1 एप्रिल, 2024 पासून सुरू होतील आणि त्यानुसार, मूल्यांकन वर्ष 2024-25 (Assessment Year) आणि त्यानंतरच्या मूल्यांकन वर्षात त्या प्रत्यक्षात लागू होतील.