गेल्या काही वर्षांपासून देशातील वाहन उद्योगात सातत्याने गुंतवणूक वाढत आहे. भारताच्या विकासासाठी ही एक महत्वाची बाब असून त्यात आणखी सुधारणा करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ऑटोमोबाईल उद्योगाची उलाढाल दुप्पट करून 15 लाख कोटी रुपये करण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठी सरकारी स्तरावर आवश्यक त्या उपापयोजना केल्या जात असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
ऑटोमोबाईल उद्योगाची उलाढाल 7.5 लाख कोटी रुपये
सध्या देशातील ऑटोमोबाईल उद्योगाची सुमारे साडेसात कोटी रुपये इतकी आहे. यामुळे देशभरातील साडेचार कोटी युवकांना रोजगार मिळतो आहे. आर्थिकदृष्ट्या आजची युवापिढी सक्षम होत असून तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांना नवनवीन संधी मिळत असल्याचे देखील मंत्री गडकरी यांनी म्हटले आहे. सरकारला सर्वाधिक वस्तू आणि सेवा कर (GST) देणारे क्षेत्र म्हणजे ऑटोमोबाईल उद्योग असल्यामुळे यात येत्या काळात आणखी गुंतवणूक होणार असल्याचे ते म्हणाले.
प्रतापगढ़ में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी बोले- '15 रुपए हो जाएगा पेट्रोल का भाव'
— IBC24 News (@IBC24News) July 4, 2023
#petrolprice | @nitin_gadkari | @BJP4India | #Pratapgarh pic.twitter.com/8aixkVHElL
10 कोटी रोजगार निर्माण करणार
ऑटोमोबाईल उद्योगात सध्या नवनवीन प्रयोग सुरु आहेत. इलेक्ट्रिक व्हेईकलने तर तर ऑटोमोबाईल उद्योगाचे चित्रच पालटले आहे. भारतातील ऑटोमोबाईल उद्योग जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. येत्या काळात यात आणखी सुधारणा होणार असून भारताची ऑटोमोबाईल उद्योगाची उलाढाल दुप्पट म्हणजे 15 लाख कोटी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट्य असल्याचे ते म्हणाले. याद्वारे देशभरात दहा कोटी रोजगार निर्माण होतील, असे ते म्हणाले. भारताने वाहन निर्मितीमध्ये जपानला मागे टाकले असून चीन आणि अमेरिकेनंतर जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आला आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली.
इथेनॉलचा वापर केल्यास पेट्रोल 15 रुपये लिटर
औद्योगिक क्षेत्रात भारतात अनेक प्रयोग केले जात आहेत. शेतकऱ्यांनी बनवलेल्या इथेनॉलचा वापर करून पेट्रोल वापरल्यास पेट्रोलच्या किमती कमी होतील असे ते म्हणाले. तसेच 60% इथेनॉल आणि 40% वीज वापरून गाड्या चालवल्या तर पेट्रोलची सरासरी किंमत ही 15 रुपये लिटर असेल असा फॉर्म्युला देखील त्यांनी सांगितला. येत्या काळात इथेनॉलचा वापर आणि इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर वाढवून पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करता येईल असे ते म्हणाले. त्यामुळे प्रदूषण रोखले जाईल आणि पर्यावरणाची देखील काळजी घेतली जाईल असे ते म्हणाले.