Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Nissan Motor India चे नवीन मॅग्नाइट गेझा स्पेशल मॉडेल मार्केट मध्ये लॉन्च

New Magnite Geza Special Model

Image Source : www.global.nissannews.com

New Magnite Geza Special Model: निसान मोटर इंडियाने भारतीय ग्राहकांची आवड लक्षात घेता, Nissan Motor ची सर्वाधिक विकली जाणारी गाडी B-SUV चे मॅग्नाइट गेझा मॉडेल मार्केट मध्ये लॉन्च केले आहे. तेव्हा ग्राहक शनिवारपासून (दि. 20 मे) कार बुक करु शकतात.

Nissan Motor India Launched New Model : निसान मॅग्नाइट गेझा स्पेशल मॉडेलची ग्राहकांना अनेक दिवसांपासून उत्सुक्ता होती. Nissan Motor India ने भारतीय ग्राहकांची आवड लक्षात घेता, Nissan Motor ची सर्वाधिक विकली जाणारी गाडी B-SUV चे  मॅग्नाइट गेझा मॉडेल मार्केट मध्ये लाँच केले आहे. कंपनीच्या अधिकृत शोरुममधून केवळ 11,000 रुपये देऊन ग्राहकांनी बुकिंगही सुरु केली आहे.

आधुनिक फिचर्स

मॅग्नाइट गेझाच्या स्पेशल एडिशनच्या खास फिचर्सने ग्राहकांना आकर्षित केले आहे. यामध्ये ग्राहकांना उच्च रिझोल्यूशन 22.86 सेमी टचस्क्रिन, वायरलेस  कनेक्टिव्हिटीसह अँड्रॉइड कारप्ले, प्रीमियम जेबीएल स्पीकर, ट्रॅजेक्टोरी रिअर कॅमेरा, आधुनिक अॅप,शार्क फिन अँटेना, प्रीमियम बेज रंगाच्या सीट अपहोल्स्ट्री, यासारख्या  प्रगत इन्फोटेनमेंट सुविधा देण्यात आल्या आहेत.

किंमत 26 मे ला जाहीर होणार

निसान मॅग्नाइट गेजा स्पेशल एडिशनचे बुकिंग ग्राहकांसाठी सुरू करण्यात आले आहे. निसान मोटर इंडियाच्या कोणत्याही शोरूममध्ये 11,000 रुपये देऊन कारची बुकिंग केली जाऊ शकते. तर, कारची किंमत 26 मे 2023 रोजी घोषित केली जाईल. B-SUV सेगमेंटमध्ये मॅग्नाइट ही ग्राहकांची पहिली पसंती ठरली आहे. ही कार पहिल्यांदा डिसेंबर 2020 मध्ये लॉन्च करण्यात आली होती.

Nissan Magnite कौतुकास पात्र

Nissan Magnite ला ग्लोबल NCAP द्वारे अॅडल्ट ऑक्युपंट सुरक्षेसाठी 4-स्टार सेफ्टी रेटिंग प्राप्त झाली आहे. मॅग्नाइट ला लॉन्च झाल्यापासून अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये दैनिक जागरणच्या iNext Iconic Awards मध्ये मिळालेल्या '2023 Iconic Brand of the Year' पुरस्काराचा समावेश आहे. टॉप गियरची 'कॉम्पॅक्ट एसयूव्ही ऑफ द इयर 2021' पुरस्कार, मोटार ऑक्टेनचा 'गेम चेंजर' पुरस्कार आणि ऑटोकार इंडियाचा 'व्हॅल्यू फॉर मनी' पुरस्कार यासारखे आवॉर्ड मिळाले आहेत.