निरमा ग्रुप देशातला नावाजलेला ब्रांड आहे. आपल्या यशस्वी घोडदौडीला निरमा ग्रुपने आजही कायम ठेवलं आहे आणि आता निरमा ग्रुप आणखी एक महत्वाचा टप्पा गाठत आहे. निरमा ग्रुपने फार्मा कंपनी ग्लेनमार्कच्या लाईफ सायन्सेसमध्ये गुंतवणूक केली आहे. निरमा ग्रुपने ग्लेनमार्कच्या लाईफ सायन्सेसमध्ये 75 टक्के हिस्से विकत घेतले आहेत. हे डील 615 रुपये प्रती शेअर किमतीत झालं असून, याद्वारे ग्लेनमार्कच्या लाईफ सायन्सेसला निरमाने 5 हजार 651 कोटी रुपये दिले आहेत. 7 हजार 500 रुपयांच्या इंटर प्राईस वॅल्यूवर या दोन कंपन्यांमध्ये ही भागीदारी झाल्याची माहिती मिळत आहे.
सेबीच्या नियमांनुसार निरमा (Nirma) सर्व सार्वजनिक भागधारकांना अनिवार्य ओपन ऑफर देईल. या करारानंतर ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसची मूळ कंपनी ग्लेनमार्क फार्मा 7.84 टक्के मालकीची असेल.
ग्लेनमार्कने का उचललं हे पाऊल?
फार्मा इंडस्ट्रीत ग्लेनमार्क हा मोठा ब्रँड आहे मग ग्लेनमार्कने ही भागीदारी करण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न उपस्थित होणं अत्यंत स्वाभाविक आहे. मात्र हे पाऊल उचलण्यावाचून ग्लेनमार्ककडे इतर कोणताही पर्याय उरला नव्हता. ग्लेनमार्क फार्मावर दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. हा डोंगर कमी करण्यावाचून इतर कोणताही पर्याय कंपनीसमोर उभा राहिला नव्हता, त्यामुळेच हे डील करण्यावाचून ग्लेनमार्ककडे इतर कोणताही पर्याय उभा राहीला नव्हता.
निरमासाठी मात्र हे डील महत्वाचं
निरमासाठी मात्र हे डील अत्यंत महत्वाचं ठरलं आहे. या डीलने निरमा ग्रुपने फार्मा क्षेत्रात आणखी एक दमदार पाऊल टाकलं आहे. निरमा ग्रुपच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसारअनेक क्षेत्रात निरमाने यशस्वी पाऊल ठेवलं आहे आणि फार्मा क्षेत्रातही निरमा प्रगतीच्या पथावर राहील.
किती आहे कंपनीची वार्षिक आर्थिक उलाढाल?
डॉ. करसनभाई पटेल यांच्या मालकीच्या निकमा समूहाने याआधीही इंमजेक्शन,नेत्र, पेरेंटल फार्मा क्षेत्रात यशस्वी वाटचाल केली आहे. कंपनीची वार्षिक उलाढाल 2.5 बिलियन डॉलर्सपेक्षा अधिक आहे.