Wealthiest Cities: जगातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून न्यूयॉर्क शहराचा पहिला क्रमांक लागला आहे. या श्रीमंत शहरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जपानमधील 'टोकियो' हे शहर असून अमेरिकेतील 'द बे एरिया' हे शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
जागतिक संपत्ती ट्रॅकर हेन्ली अँड पार्टनर्सच्या (Henley and Partners) मते, न्यूयॉर्क शहरांत 3 लाख 40 हजार करोडपती राहतात तर टोकियो शहरात 2 लाख 90 हजार 300 कोट्याधीश रहात असून ,द बे एरिया' शहरात 2 लाख 85 हजार करोडपती राहतात. शहरांमध्ये राहत असलेल्या करोडपती व्यक्तींच्या संख्येवरून कोणते शहर अधिक श्रीमंत आहे याचा अंदाज हेन्ली अँड पार्टनर्स ही संस्था घेते आणि दरवर्षी श्रीमंत शहरांची यादी प्रकाशित करत असते.
श्रीमंत शहरांच्या यादीत अमेरिकेचे वर्चस्व असून न्यूयॉर्क, द बे एरिया, लॉस एंजेलिस आणि शिकागो या चार शहरांनी यादीत स्थान मिळवले आहे. लॉस एंजेलिस शहरात 2 लाख 5 हजार 400 कोट्याधीश राहतात तर शिकागो शहरात 1 लाख 24 हजार करोडपती रहातात असे या अहवालात म्हटले आहे.
या यादीत चीनमधील बीजिंग आणि शांघाय या दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या दहा श्रीमंत शहरांच्या यादीत बीजिंग आठव्या स्थानावर असून इथे 1 लाख 28 हजार 200 करोडपती राहतात तर नवव्या स्थानावर असलेल्या शांघाय शहरांत 1 लाख 27 हजार 200 करोडपती राहतात अशी नोंद या अहवालात केली गेली आहे.
World’s Wealthiest Cities
— BQ Prime (@bqprime) April 19, 2023
These five Indian cities are among the world's wealthiest in 2023, according to Henley & Partners.
96 cities were ranked based on the number of millionaire residents.
Read: https://t.co/NkopL2dHza pic.twitter.com/9vr8JMdRz6
भारतातील शहरांचा कितवा नंबर?
भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोक मुंबईत राहतात असे या अहवालात म्हटले आहे. श्रीमंत शहरांच्या यादीत मुंबईचा 21 वा क्रमांक असून, मुंबईत 59,400 करोडपती राहतात असे या अहवालात म्हटले आहे.
देशाची राजधानी दिल्ली या यादीत 36 व्या क्रमांकावर आहे. दिल्लीत 30,200 कोट्याधीश राहतात अशी नोंद या अहवालात पाहायला मिळते आहे. तसेच 60 व्या क्रमांकावर बेंगळूरू हे शहर असून येथे 12,600 करोडपती राहतात तर 63 व्या क्रमांकावर कलकत्ता (12,100 कोट्याधीश) हे शहर असून 65 व्या क्रमांकावर हैद्राबाद (11,100 कोट्याधीश) हे शहर आहे.
ही यादी प्रकाशित करत असताना कुठल्या शहरांत किती श्रीमंत व्यक्ती राहतात याचा अंदाज घेण्यात आला आहे. शहरांत राहत असलेल्या श्रीमंतांच्या वैयक्तिक संपत्तीच्या आधारे (USD) ही यादी बनवली गेली आहे. संपत्तीचे मूल्यांकन यात केले गेलेले नाही.