Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

National Pension Scheme साठी नवे अपडेटेड पोर्टल सुरु, गुंतवणूकदारांचे काम होणार सोपे!

National Pension Scheme

ग्राहकांना NPS मध्ये खाते सुरु करायचे असल्यास, त्यांना आता एका क्लिकवर याबाबतची सर्व माहिती मिळणार आहे. खाते कसे सुरु करावे, त्याचे फायदे काय आहेत, त्यात गुंतवणूक कशी करावी अशी सर्व माहिती पोर्टलवर साध्यासोप्या पद्धतीने मिळणार आहे.

तुम्ही जर राष्ट्रीय पेन्शन योजनेत (NPS) गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची ठरणार आहे. शिवाय जे गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणूक करणार आहेत त्यांनी देखील याबाबतचे अपडेट जाणून घेतले पाहिजेत. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने नुकतीच नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्टची अपडेटेड वेबसाइट https://npstrust.org.in  सुरू केली आहे. या नव्या वेबसाईटवर गुंतवणूकदारांना भरपूर फीचर्स अनुभवता येणार आहेत. आता घरबसल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या पैशांची माहिती घेता येणार आहे.

ही वेबसाईट हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. NPS मधील गुंतवणुकीत आतापर्यंत मिळालेला परतावा, वार्षिक परतावा आदी माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे. 
National Pension Scheme अधिक मजबूत करण्यासाठी वेबसाइटमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.

या वेबसाईटवर गुंतवणूकदारांना राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि अटल पेन्शन योजना (APY) शी संबंधित माहिती साध्यासोप्या भाषेत दिली जाणार आहे. ही वेबसाइट युजर्सलात्यांच्या मोबाईलवर देखील वापरता येणार आहे.

एका क्लिकवर मिळवा माहिती 

ग्राहकांना NPS मध्ये खाते सुरु करायचे असल्यास, त्यांना आता एका क्लिकवर याबाबतची सर्व माहिती मिळणार आहे. खाते कसे सुरु करावे, त्याचे फायदे काय आहेत, त्यात गुंतवणूक कशी करावी अशी सर्व माहिती पोर्टलवर देण्यात आली आहे.

प्लॅन रिटायरमेंट (पेन्शन कॅल्क्युलेटर) आणि एनपीएस होल्डिंग बाबतची माहिती देखील गुंतवणूकदारांना एका क्लिकवर बघता येणार आहे. तसेच पेन्शन कॅल्क्युलेटर वापरून किती गुंतवणूक करावी, किती परतावा मिळेल याचा अंदाज गुंतवणूकदारांना बांधता येणार आहे. एकाच वेबसाईटवर ही सगळी माहिती उपलब्ध होणार असल्यामुळे ग्राहकांच्या समस्यांचे लवकरात लवकर निदान होणार आहे.

NPS खात्याचे तपशील बघता येणार!

या वेबसाइटवर राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि अटल पेन्शन योजना (APY) या दोन्ही योजनांची माहिती यावर देण्यात आली आहे. ग्राहक त्यांचा PRAN नंबर, जन्मतारीख आणि नोंदणीकृत मोबाईल फोनवर आलेला ओटीपी प्रमाणित करून त्यांच्या NPS खात्याचे तपशील बघू शकतील.

यासोबतच Demat account असलेल्या खातेदारांना देखील त्यांच्या Demat खात्यावरून NPS चे तपशील बघण्याची सुविधा PFRDA नुकतीच जाहीर केली आहे. या सर्वांचा फायदा सामान्य गुंतवणूकदारांना होणार आहे.