जागतिक सुवर्ण परिषदेने त्यांच्या एका अहवालात म्हटले होते की, भारतात आर्थिक साक्षरता वाढल्यामुळे भारतीयांकडून सोन्याऐवजी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतीय नागरिक सध्या अनेक आर्थिक गुंतवणूक योजनामध्ये गुंतवणूक करत आहेत. म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये (SIP) गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जून महिन्यात भारतात एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नवीन खातेदारांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. जून महिन्यात एकूण 2.78 मिलियन नवीन एसआयपी(SIP) खात्यांची नोंद झाली असल्याचे वृत्त इकोनॉमिक्स टाईस्मने दिले आहे.
कमी गुंतवणूक करणाऱ्या खातेदारांची संख्या जास्त
एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये कमी रकमेच्या खांत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (AMFI) च्या आकडेवारीनुसार जून 2023 मध्ये तब्बल 27.8 लाख नवीन SIP खात्यांच्या नोंदणी झाली आहे. ही वाढ मागील आकडेवारीच्या तुलनेत विक्रमी असून नवा उच्चांक गाठणारी आहे. यापूर्वी सप्टेंबर 2021 मध्ये 2.68 मिलियन एसआयपी खात्यांची नोंद उच्चांकी ठरली होती. तो उच्चांक जूनच्या आकडेवारीने मोडीत काढला आहे.
महिन्याला सरासरी 21.2 लाख खाती
सरासरी, गेल्या 12 महिन्यांत दरमहा सुमारे 21.2 लाख नवीन SIP खाती उघडण्यात आली आहेत. या माध्यमातून एकूण 26 मिलियन रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या खात्यांचा सरासरी गुंतवणुकीचा आकार हा जूनमध्ये 2,214 रुपयांवर वर घसरला आहे,जी मागील पाच वर्षांपूर्वी 3,304 रुपये सरासरी गुंतवणूक होती. जूनमध्ये निव्वळ SIP खात्याची झालेली नोंदणी मागील 18 महिन्यांतील सर्वोच्च आकडेवारी आहे. जून महिन्यांच्या SIP खात्यांच्या नोंदणींसह एकूण SIP खाती 67 दशलक्षांपर्यंत पोहोचली असल्याची माहिती AMFI दिली आहे. शेअर बाजारातील सध्याच्या तेजीमुळे SIP खात्यांचे सरासरी पोर्टफोलिओचे मूल्य 1.2 लाख झाले असून हे मागील 20 महिन्यांतील सर्वोच्च आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            