Axis बँकेने आपल्या Magnus Credit Card मध्ये 1 सप्टेंबरपासून काही बदल प्रस्तावित केले आहेत. या बदलामुळे Magnus Credit Card धारकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. Axis बँकेने शुक्रवारी (दि. 21 जुलै) याबाबत अधिकृत घोषणा केलीआहे.
बँकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, Magnus Credit Card च्या टर्म्स आणि कंडिशनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत आणि हे बदल 1 सप्टेंबर, 2023 पासून लागू होतील. या कार्डवर मिळणारा 25,000 पॉईंटसचा फायदादेखील आता ग्राहकांना मिळणार नाही. त्याचबरोबर या कार्डची वार्षिक सुद्धा वाढवण्यात आली आहे. सध्या या कार्डसाठी बँक वर्षाला 10,000 आणि जीएसटी असा चार्ज स्वीकारत होती. पण आता हा चार्ज 12,500 रुपये अधिक जीएसटी असा आकारला जाणार आहे.
Magnus Credit Card वर कार्डधारकाला अधिकाधिक शॉपिंग किंवा खर्च केल्यास जास्तीचे 3 लाख अतिरिक्त पॉईंट मिळण्याची सुविधा होती. जी या कार्डची खासियत होती. या पॉईंटच्या मदतीने कार्डधारक एअर ट्रॅव्हलिंग करताना प्रवासाच्या खर्चात भरमसाठी डिस्काऊंट मिळवत होता. जो आता कमी होणार आहे. त्याचबरोबर याचा ट्रान्सफर रेशोदेखील 5:4 वरून 5:2 करण्यात आला आहे. Axis बँकेने Magnus Credit Card मध्ये केलेल्या बदलामुळे अनेक कार्डधारक ग्राहक नाराज झाले आहेत. त्यांनी त्याबाबत ट्विटरवर आपली नाराजी उघडपणे व्यक्त करून, बँकेच्या सीईओंना याबाबत विचारणा करणार असल्याचेही म्हटले आहे.
पूर्वी बँक Magnus Credit Card च्या माध्यमातून कार्डधारकांना विविध सवलती तर देत होतीच. पण त्याचबरोबर त्याची फी सुद्धा कमी होती. पण आता तर बँकेने सुविधाही कमी केल्या आणि त्याच्या वार्षिक फी मध्ये 2,500 रुपयांची वाढ केली आहे. त्याचबरोबर या कार्डद्वारे केली जाणारी खर्चाची मर्यादा देखील 15 लाखावरून 25 लाख करण्यात आली आहे. जी अनेक कार्डधारकांसाठी वाजवी ठरू शकते. तसेच ग्राहकांना कार्डचे नुतणीकरन करताना कोणतेही व्हाऊचर दिले जाणार नाही.
बँकेने ग्राहकांना व्हाऊचर कार्डचे पर्याय उपलब्ध करून दिले असून त्यातील एक व्हाऊचर कार्ड ग्राहक निवडू शकतात. यामध्ये लक्स गिफ्ट कार्ड, पोस्टकार्ड हॉटेल्स गिफ्ट व्हाऊचर आणि ट्रॅव्हल गिफ्ट व्हाऊचर. यामधून बँकेने TATA CLiQ व्हाऊचरचा पर्याय देणे बंद केला आहे.