New Ola S One Air Model: 1 जून पासून इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या किंमतीमध्ये वाढ झाली. परंतु, तरीदेखील ग्राहकांची सगळ्यात जास्त पसंती इलेक्ट्रिक टू व्हीलरलाच दिसून आली. मे महिन्यात ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक टू व्हीलरची सगळ्यात जास्त विक्री झाल्याचे दिसुन आले. ग्राहकांची पसंती लक्षात घेता, ओला कंपनीने (OLA) जुलैमध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्केटमध्ये आणण्याची तयारी सुरु केली आहे. Ola कंपनी आपल्या S One (Ola S1) च्या लाइन-अपमध्ये आणखी एक नवीन प्रकार समाविष्ट करण्याची तयारी करत आहे.
Table of contents [Show]
अधिकाऱ्यांनी दिली माहिती
ओला इलेक्ट्रिकचे सीईओ आणि संस्थापक (OLA CEO)भाविश अग्रवाल यांनी माहिती दिली की, ओला कंपनी येत्या जुलैच्या इव्हेंटमध्ये पुढील मॉडेल बाजारात आणेल. परंतु, ओला कंपनीने जुलैमध्ये येणाऱ्या या नवीन मॉडेल बाबत सध्या कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही.
Ola S One Air ची किंमत किती?
ग्राहकांना Ola S One Air च्या 3kWh आवृत्तीसाठी सुमारे 1.10 लाख रुपये मोजावे लागतील. अलीकडेच FAME (Faster Adoption and Manufacturing of (Hybrid &) Electric Vehicles in India) योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामुळे वाढलेली सबसिडी त्यात समाविष्ट करण्यात आली आहे.
जुलैपासून होणार डिलिव्हरी
ओला कंपनी आपल्या S1 एअरची डिलिव्हरी जुलै महिन्यापासून सुरू करणार आहे. असे मानले जात आहे की, ओला कंपनी आपल्या इलेक्ट्रिक वाहनांची किंमत ग्राहकांना अधिक परवडणारी करण्याचा विचार करत आहे. यासोबतच ओला कंपनी भविष्यात तीन ते चार नवीन मॉडेल्स बाजारात आणू शकते.
कंपनीची विक्री वाढण्याची शक्यता
कंपनीच्या एस1 एअर मॉडेलने मार्केटमध्ये प्रवेश केल्यावर ओला आणखी किंमतींच्या बाबतीत ग्राहकांना परवडणारा ब्रँड बनेल. या उत्पादनामुळे कंपनीच्या विक्रीत आणखी वाढ होणार असल्याची शक्यता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.