Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Aegon Life iTerm: सेल्फ-एम्प्लॉएड व्यक्तींसाठी नवा इन्शुरन्स प्लॅन! जाणून घ्या संपूर्ण माहिती

Aegon Life iTerm

Aegon Life iTerm: एगॉन लाईफ इन्शुरन्स (Aegon) या खाजगी क्षेत्रातील विमा कंपनीने स्वयंरोजगार क्षेत्रातील लोकांसाठी “iTerm प्राइम इन्शुरन्स प्लॅन” नावाची नवीन टर्म इन्शुरन्स पॉलिसी आणली आहे.

भारत हा एकाच वेळी जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रम शक्ती असलेला आणि तरी देखील 8.30 टक्के इतका उच्च बेरोजगारी गाठलेला देश आहे. परंतु तरी देखील, स्वतःवर विश्वास ठेऊन स्वयंउद्योगी (स्वयं-रोजगार) असणाऱ्या लोकांची संख्या वर्ष 2021 अनुसार 333 दशलक्ष (सुमारे 33 कोटी) इतकी होती. मात्र इतक्या मोठ्या लोकसंख्येचे लाईफ कव्हर करणारे पुरेसे टर्म इन्शुरन्स प्लॅन फारसे उपलब्ध नव्हते. अलीकडेच, एगॉन लाईफ इन्शुरन्स (Aegon) या खाजगी क्षेत्रातील विमा कंपनीने स्वयंरोजगार क्षेत्रासाठी “iTerm प्राइम इन्शुरन्स प्लॅन” नावाची नवीन टर्म इन्शुरन्स पॉलिसी सुरू केली आहे. हा एक वैशिष्ट्यपूर्ण नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे.

Aegon Life iTerm प्राईम इन्शुरन्स प्लॅनची वैशिष्ट्ये

एकरकमी डेथ-क्लेम

हा टर्म इन्शुरन्स प्लॅन मुख्यतः “स्वयं-रोजगार असलेल्या क्षेत्रातील व्यक्तींसाठी” डिझाईन केलेला आहे. अगदी 25 लाख रुपये इतक्या किमान विमा रक्कमेसह उपलब्ध असेल. पॉलिसीचे कमाल मूल्यावर कोणतीही मर्यादा नाही. पॉलिसी धारकाचा पॉलिसी कालावधी दरम्यान मृत्यू झाल्यास, नॉमिनीला “एकरकमी डेथ-क्लेम” (Lump Sum Assured Death Claim Amount) दिला जाईल. iTerm प्राइम इन्शुरन्स प्लॅनच्या पहिल्या वर्षाच्या प्रीमियमवर 10 टक्के इतकी विशेष सवलत कंपनी देऊ करणार आहे.

फक्त पॅन किंवा आधार कार्डने काढता येते पॉलिसी

स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींच्या मोठ्या लोकसंख्येला केवळ पेपर-वर्क अर्थात डॉक्युमेंट्सच्या अडचणींमुळे अतिशय आवश्यक असणारी टर्म इन्शुरन्सच्या लाईफ कव्हर पासून वंचित राहावे लागत आले आहे. मात्र Aegon लाईफ इंशुरन्स कंपनी स्वयंरोजगारांना फक्त त्यांचे वैध पॅन कार्ड (PAN card), तसेच आधार कार्ड  किंवा ड्रायव्हरच्या परवान्यासह टर्म पॉलिसी खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. तसेच कोणतेही अतिरिक्त डॉक्युमेंट्स पॉलिसीधारकाला अपलोड किंवा स्कॅन करण्याची आवश्यकता नसणार आहे.

पॉलिसी घेण्याचे वय 40 वर्ष

या टर्म इन्शुरन्सचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे यासोबत मिळणारा “स्पेशल एक्झिट व्हॅल्यू” नावाचा पर्याय.  पॉलिसीधारकाने त्याच्या वयाची 55 वर्षे पूर्ण केल्यावर, योजना संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्यास,  त्या वेळेपर्यंत त्याने भरलेले सर्व प्रीमियमस् त्याला परत केले जातील. यासाठी पॉलिसी मध्ये प्रवेशाचे वय 40 वर्षे आहे आणि पॉलिसीची मुदत 70 वर्षांपर्यंत आहे. हा टर्म इन्शुरन्स प्लॅन 18 वर्षे पूर्ण असणारी व्यक्ती खरेदी करू शकते. पॉलिसीमध्ये प्रवेश करण्याचे कमाल वय “रेग्युलर पेमेंट साठी” 65 वर्षे आणि “लिमिटेड पेमेंट साठी” 50 वर्षे आहे.

70 वर्षांपर्यंत लाईफ कव्हर

रेग्युलर प्रिमिअम पेमेंट मोड-करीता, पॉलिसीधारकाला पॉलिसीच्या संपूर्ण मुदतीत प्रीमियम भरावा लागणार आहे. तर  लिमिटेड प्रिमिअम पेमेंट मोड-करीता, पॉलिसीधारक  निश्चित कालावधीसाठी प्रीमियम भरू शकतो आणि वयाच्या 70 वर्षापर्यंत लाईफ कव्हरेज एन्जॉय करू शकतो.

36 गंभीर आजारांचा समावेश

या टर्म इन्शुरन्स प्लॅन-सोबत इन्शुरर दोन प्रकारचे रायडर देखील ऑफर करीत आहे - Accidental Death Benefit Rider म्हणजे पॉलिसीधारकाचा मृत्यू अपघातामुळे झाल्यास रायडरच्या विम्याच्या रकमेइतका एकरकमी लाभ (lump sum) दिला जातो. याव्यतिरिक्त 36 गंभीर आजारांपैकी कोणतेही निदान झाल्यास होणारी नुकसान-भरपाई कव्हर करणारा Critical Illness Rider हा एकरकमी लाभ आणि/किंवा प्रीमियमची माफी (Waiver Of Premium) देणारा रायडर अंतर्भूत केला आहे. पॉलिसी प्रीमियम पेमेंटवर 15-30 दिवसांचा वाढीव कालावधी (Grace Period) देखील दिला जाणार आहे.

एगॉन लाइफ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ सतीश्वर बी. यांच्या मते, “iTerm Prime” ह्या टर्म इन्शुरन्सचे डिजाईन उदयोन्मुख भारताला लाईफ इन्शुरन्स क्षेत्रामध्ये  प्रवेश मिळवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आले आहे. स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती भारतातील बहुसंख्य कार्यरत लोकसंख्येचा भाग असून देखील अत्यंत अल्प प्रमाणात लाईफ-कव्हर धारक आहेत. या टर्म प्लॅनच्या निमित्ताने Aegon लाईफ इन्शुरन्स कंपनीने अधिक किफायतशीर, खरेदी करण्यास सोपे आणि प्रिमिअमचे पेमेंट करण्यास फ्लेक्झिबल असे इन्शुरन्स प्रॉडक्ट बाजारात आणले आहे. प्रिमिअमचे दर तसेच फिचर्ससंबंधी अधिक तपशीलवार माहितीसाठी आणि ऑनलाईन इन्शुरन्स खरेदीसाठी तुम्ही एगॉनच्या वेबसाइटला  भेट देऊ शकता.