सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबविल्या जातात. त्यापैकी एक मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय वीज सुविधा शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने ही योजना सुरू केली असून त्याअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणार आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सौर पॅनेल बसवून वीज पुरवठा केला जाणार आहे. या योजनेंतर्गत, कृषी बहुल भागात सुमारे 2 ते 10 मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प 5 किमी सबस्टेशनच्या आत कार्यान्वित केले जातील. सौर प्रकल्पांच्या स्थापनेसाठी उपलब्ध क्षमता असलेल्या 33/11 केव्ही महावितरणच्या सबस्टेशनची यादी उपलब्ध आहे. शेतकऱ्यांची अतिरिक्त जमीन भाडेतत्त्वावर देण्यासाठीही महावितरण मदत करेल.
सौर कृषी वाहिनी योजनेचे उद्दिष्टे
- जे शेतकरी विजेचा खर्च भागवू शकत नाहीत, त्यांना स्वस्तात वीज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- संपूर्ण शेतकरी वर्गाला विजेचा वापर करता यावा यासाठी कमी दरात वीज उपलब्ध करून देणे.
- शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी सौरऊर्जेचा वापर केला जाईल.
- सौरऊर्जा निर्मितीसाठी राज्यातील विविध भागात सौर पॅनेल उभारण्यात येईल.
- या योजनेद्वारे सर्व शेतकरी वर्गाला त्यांच्या घरी वीज पुरवठा होणार आहे.
- सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला भरपूर लाभ मिळावा.
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी शेतकरी आपली जमीन १५ वर्षांसाठी सरकारला भाड्याने देणार आहेत.
- या योजेनच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण
राज्यातील अनेक भागात गावातील आणि शेतीतील वीज वेगळी केलेली आहे. कृषी वाहिन्या सौर उर्जेवर आणण्यासाठी सौर कृषी वाहिनी या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत. या योजनेच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यातील 30 टक्के कृषी वाहिन्या सौर उर्जेवर आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 3000 कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यात येणार असून याकरिता 15000 एकर जमिनीवरून सुमारे 4000 मेगा वॅट विजेची निर्मिती होणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार उत्पन्नाची नवी संधी
उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister)आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील 30 टक्के कृषी वाहिन्या सौर उर्जेवर आणण्याबाबतचे निश्चित करण्यात आले. 4000 मेगावॅट वीज निर्मितीसाठी महावितरण शेतकऱ्यांची जमीन भाडे तत्त्वावर घेणार आहे. यासाठी 2500 उपकेंद्रमधील 4000 मेगावॅट क्षमतेच्या 3000 कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्याकरिता 15000 एकर जमिनीची आवश्यकता आहे. शेतकरी आपली जमीन भाडेतत्त्वावर देऊन सुद्धा उत्पन्न मिळवू शकतात. प्रति वर्ष 75 हजार रुपये प्रति हेक्टर दराने वार्षिक भाडेपट्ट्याचा दर निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच शेतकऱ्याला आपली जमीन भाडे तत्त्वावर (Rental fee) दिल्यानंतर प्रती हेक्टर 75 हजार रुपये वर्ष मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.