Self-Charging Cars : जर्मनीची कंपनी न्यूट्रिनो ग्रुपने गेल्या आठवड्यात भारतातील सुपरकॅपॅसिटर निर्माता स्पॉलशी करार केला आहे. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय,पुणे अंतर्गत (CEMAT)सेंटर फॉर इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मटेरियल्सच्या सहकार्याने न्यूट्रिनो ग्रुपने स्वच्छ आणि हरित ऊर्जा व्हिक्सनसाठी भारतात 2.5 अब्ज युरोची गुंतवणूक जाहीर केली आहे. या प्रकल्पांतर्गत सेल्फ चार्जिंग इलेक्ट्रिक कार विकसित करण्यात येणार आहे. ही सेल्फ चार्जिंग इलेक्ट्रिक कार पुढील 3 वर्षांत बाजारात येण्याची शक्यता आहे.
सेल्फ चार्जिंग कार म्हणजे काय?
झपाट्याने वाढत असलेले इंधनाचे दर आणि वाहनांपासून होणारे प्रचंड प्रदूषण यावर एक पर्याय म्हणून प्युअर हायब्रीड कारकडे पाहिले जात आहे. प्युअर हायब्रीड, म्हणजेच सेल्फ चार्जिंग तंत्राद्वारे पेट्रोल इंजिन आणि विद्युत मोटर अशा दोघांचा मेळ आहे. ही कार बॅटरीवर आणि मोटरवरही चालते. बॅटरी ही स्वयंसिद्ध (सेल्फचार्ज) होते. त्यामुळे जास्तीत जास्त मायलेजसह पिकअप व टॉर्कही ती उत्पन्न करते. यात महत्त्वाचा भाग आहे तो बॅटरी रिजनरेशन. या कार बॅटरीवर सुरू होतात. त्यामुळे कोणताही आवाज करीत नाहीत. बॅटरीवर ती अगदी ४० ते ५० कि.मी. प्रतिलिटरचा वेग धारण करीत तीन ते चार किलोमीटरचा पल्ला गाठू शकते. त्यानंतर ती आपोआप इंजिनवर चालते. क्लच व ब्रेकिंग वारंवार केल्यानंतर बॅटरी सेल्फचार्ज होतात व ती पुन्हा ईव्ही वर जाते. हा बदल होताना अगदी नकळत होत असतो.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर
क्वांटम कॉम्प्युटर आणि सिम्युलेटरच्या मदतीने, शास्त्रज्ञ प्रगत सिम्युलेशन आणि अमर्याद क्षमतेचा वापर करून न्यूट्रिनो एनर्जी सोल्यूशन्सच्या विकासास गती देऊ शकतात. कंपनी आधीच अस्तित्वात असलेल्या ऊर्जेच्या पायाभूत सुविधांमध्ये कोणताही हस्तक्षेप न करता, नवीन तंत्रज्ञानाने ऊर्जेच्या पायाभूत सुविधा उभारून ऊर्जेची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. न्यूट्रिनो एनर्जी ग्रुपच्या संशोधन आणि विकासानुसार, ते क्वांटम तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एकत्रीकरणाच्या मदतीने ऊर्जा निर्माण करण्याचे काम करत आहे.