Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

National Youth Day: तरूणांना असे आर्थिक साक्षर करा!

Make the youth financially literate!

National Youth Day 2023: भारतात 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या युवा दिनानिमित्त आपण युवकांना आवश्यक असलेल्या आर्थिक साक्षरतेची आणि आर्थिक घडामोडींची माहिती सांगणार आहोत.

National Youth Day 2023: प्रत्येक पालकाच्या मनात आपल्या मुलांबद्दल धाकधूक असते की, तो त्याचे आयुष्य आपल्याविना कसे जगेल. आताचे जग इतके व्यावहारिक झाले आहे. त्यात हा कसा फिट बसेल आणि स्वतंत्रपणे किंवा एकट्याने आर्थिक व्यवहार करायला त्याला जमेल का? असे अनेक प्रश्न पालकांच्या मनात सुरू असतात. पण खरं सांगायचं झालं तर आपल्यापैकी कोणाही आईच्या पोटातून कोणतीच गोष्ट शिकून येत नाही. आपणही मोठे होत-होतच शिकलो. जगण्याची कौशल्ये ही जगात राहून त्याचा अनुभव घेऊनच शिकता येतात. कारण त्याला प्रत्यक्ष अनुभवाचा स्पर्श झालेला असतो. त्यामुळे अशी कौशल्ये मुलांमध्ये विकसित करण्यासाठी पालकांना पुढाकार घ्यावा लागेल. त्यांनी ती संधी दिली पाहिजे.  

आपल्याकडे अजूनही विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षण दिले जात नाही. आर्थिक शिक्षण तर दूरचीच गोष्ट आहे. त्यामुळे मुलांचा जेव्हा प्रत्यक्ष समाजात वावर सुरू होतो. तेव्हापासून पालकांनी त्यांना पैशांबाबतच्या मूलभूत गोष्टी शिकवणे गरजेचे तर आहेच. पण ही पालकांची जबाबदारी सुद्धा आहे. यासाठी काही मूलभूत गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही मुलांच्या आर्थिक साक्षरतेला (Financial Literacy) बळ देऊ शकता.

घरातले सिंपल बजेट

बऱ्याचवेळा मुलांना काय कळते असे ठरवून घरातील आर्थिक निर्णयांमध्ये सहभागी करून घेतले जात नाही. उलट कुटुंबातील तरूणा मुलांना घराच्या नियमित बजेटमध्ये सहभागी करून त्याचे नियोजन आणि मॅनेजमेंट कसे केले जाते, हे सांगितले पाहिजे. तसेच बजेट म्हणजे काय? त्यात पैसे कोठून येतात? ते खर्च कसे होतात? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याचा मेळ कसा साधला जातो. हे मुलांना सांगता येऊ शकेल.

बॅकेशी संबंधित बेसिक गोष्टींची माहिती

सध्या डिजिटल वॉलेट आणि युपीआय किंवा गुगल पे चा वापर करणाऱ्यांना बॅंकेतील बेसिक नियम माहित नसतात. कारण त्याचा तितकासा संबंधच येत नाही, असे सांगितले जाते. पण प्रत्यक्ष बॅंकेतील कामकाज, चेक लिहिणे, डिमांड ड्राफ्ट काढणे, शिक्षणासाठी कर्ज घ्यायचे असेल तर कोणत्या गोष्टी लागतात. ओव्हड्राफ्ट म्हणजे काय? याची माहिती मुलांना देता येऊ शकते. 

इमर्जन्सी फंडचे महत्त्व

इमर्जन्सी किंवा आपत्कालीन स्थिती कोणावरही आणि कधीही येते. यासाठी आपण तयार असणे गरजेचे आहे. एखादी आपत्कालीन स्थिती आल्यावर त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याकडे पुरेसे आर्थिक पाठबळ असणे गरजेचे आहे. दररोजच्या खर्चातून ठराविक टक्के रक्कम बाजूला ठेवून इमर्जन्सी फंड तयार करता येतो आणि या फंडाची मदत आपत्कालीन स्थितीत कशी होते. याचे महत्त्व सांगून मुलांना यासाठी लवकर तयार करता येऊ शकते.

बदलत्या परिस्थितीनुसार निर्णय घेणे

आजच्या जगात नोकरीची ठाम हमी कोणीच देत नाही. त्यामुळे आज जी नोकरी सुरू आहे. ती उद्या राहीलच असे नाही. त्यामुळे पीजी करून राहणाऱ्या मित्रांमधील एखाद्याने वेळेवर भाडे दिले नाही तर विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. अशावेळी वाईट प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी म्हणून आपली आर्थिक बाजू मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

आर्थिक-डिजिटली साक्षरता

सध्याची मुले अगोदरच्या पिढीपेक्षा डिजिटली एक पाऊल पुढे आहेत, असे म्हटले जाते. पण तेवढीच त्यांच्यामध्ये चंचलता सुद्धा आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या योजना, त्यातून मिळणारे फायदे, तसेच धोकादायक योजना कोणत्या, लोकांची कशातून फसवणूक केली जाते. याची माहिती असणे गरजेचे झाले आहे. तसेच पैसे गुंतवण्याचे अनेक मार्ग सध्या उपलब्ध आहेत. पण त्यातील जोखीम, नफा आणि फसवणूक होण्याची शक्यता लक्षात न घेता गुंतवणूक करू नये. याबाबत डिजिटली साक्षर (Digital Literate) असणे गरजेचे आहे.

आपल्या मुलांना आर्थिक साक्षर करण्यासाठी कोणताही कोर्स किंवा औपचारिक शिक्षणाची गरज नाही. प्रत्यक्ष व्यवहारिक ज्ञानाने बऱ्याच गोष्टींमधील गुंतागुंत कमी होऊ शकते आणि या सवयीमध्ये सातत्या राहिले तर मुलांचा आत्मविश्वास वाढतो.