Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंड: पद्धतशीर हस्तांतरण योजना (Systematic Transfer Plan) म्हणजे काय?

म्युच्युअल फंड: पद्धतशीर हस्तांतरण योजना (Systematic Transfer Plan) म्हणजे काय?

Image Source : www.valueresearchonline.com

बाजारातील संभाव्य जोखमींमुळे गुंतवणूकदार दररोज एकरकमी गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक नसतात. म्हणूनच आर्थिक तज्ज्ञ ही जोखीम कमी करण्यासाठी पद्धतशीर हस्तांतरण योजना (STP) वापरण्याचा सल्ला देतात. आज आपण याबाबत अधिक जाणून घेणार आहोत.

वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला सिस्टॅमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIPs) बद्दल माहिती आहे. पण त्याला सिस्टॅमॅटिक ट्रान्सफर प्लॅनबद्दल (STP) माहिती नाही. सिस्टॅमॅटिक ट्रान्सफर प्लॅन हा एसआयपीच्या अगदी विरूद्ध आहे. SIP मध्ये बॅंक खात्यातून पैसे म्युच्युअल फंड योजनेत जातात. तर STP मध्ये एका म्युच्युअल फंडमधून दुसऱ्या म्युच्युअलमध्ये पैसे ट्रान्सफर होतात. एसटीपी ही बाजारातील चढउतारामुळे निर्माण झालेला धोका कमी करण्यासाठी आणि गुंतवणुकीवरील परतावा संतुलित करण्याची एक स्मार्ट योजना आहे.

उदाहरणार्थ, तुम्ही इक्विटीमध्ये STP द्वारे गुंतवणूक केल्यास बाजार अस्थिर असतानाही तुम्ही जोखीममुक्त परतावा मिळवू शकता. या योजनेत फंड कंपनी तुम्हाला एका फंडात एकरकमी गुंतवणूक करण्याची आणि त्याच गुंतवणुकीतील ठराविक रक्कम दुसऱ्या फंडमध्ये नियमितपणे ट्रान्सफर करण्याची परवानगी देते.

पद्धतशीर हस्तांतरण योजना (STP) कशी सुरू करावी?

एका विशिष्ट कालावधीत तुमच्या गुंतवणुकीवरील सरासरी परतावा वाढवण्यासाठी तज्ज्ञांच्या मते एसटीपी ही एक चांगली योजना मानली जाते. एखाद्या गुंतवणूकदाराने एसटीपी करायचे की एकरकमी गुंतवणूक करायची, हे गुंतवणूकदाराचे इक्विटीमधील सध्याची गुंतवणक, गुंतवणूकदाराचा प्रोफाइल आणि शेवटी बाजाराचा दृष्टिकोन या तीन घटकांवर अवलंबून असते.
तुम्हाला एसटीपीमध्ये दररोज, साप्ताहिक, मासिक किंवा तीन महिन्यांनी रक्कम ट्रान्सफर करण्याची सुविधा आहे.
उदाहरणार्थ, तुम्ही 20 वर्षांसाठी इक्विटीत एसआयपीद्वारे पैसे गुंतवत आहात. पण जसे तुमचे वय वाढत जाईल तसे तुम्ही गुंतवणूक केलेल्या फंडातील परताव्यावर होणारे नुकसान टाळण्यासाठी एसटीपी सुरू करू शकता. यासाठी एक छोटीसी प्रक्रिया पूर्ण करून नियमित गुंतवणुकीतील रक्कम STP द्वारे सुरक्षित फंडमध्ये वळवू शकता.

पद्धतशीर हस्तांतरण योजनेची वैशिष्ट्ये

फंड पद्धतशीर हस्तांतरण योजना (Systematic Transfer Plan) म्हणजे काय

किमान गुंतवणूक
ज्या खात्यामधून रक्कम ट्रान्सफर करायची आहे. त्या खात्यात किती रक्कम गुंतवायची याबाबत काही प्रमाणित नियम किंवा धोरण नाही. पण काही फंड कंपन्या पद्धतशीर हस्तांतरण योजनांसाठी किमान 12 हजार रूपये ठेवण्याचा सल्ला देतात.

प्रवेश आणि निर्गमन लोड
एसटीपी अंतर्गत एका म्युच्युअल फंडमधून दुसर्‍या फंडमध्ये किमान सहा व्यवहार होणे आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी व्यवहार होत असतील तर त्यावर 2 टक्क्यांपेक्षा कमी एक्सिट लोड लागू शकतो.

शिस्तबद्ध आणि आकर्षक
सिस्टॅमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (STP)  हे दोन म्युच्युअल फंडमधील रक्कम शिस्तबद्ध आणि नियोजितपणे हस्तांतर करतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, गुंतवणूकदार डेब्ट फंडातून इक्विटी फंडात एसटीपी सुरू करतात.

STP वर कर आकारणी
एसटीपी ही एक चांगली योजना असली तरी, त्या प्रक्रियेतील हस्तांतरणावर टॅक्स आणि एक्झिट लोड्स लागू असतो. एका फंडातून दुसऱ्या फंडात केलेली गुंतवणूक ही नवीन गुंतवणूक मानली जाते. डेब्ट फंडातून पहिल्या तीन वर्षात ट्रान्सफर केलेली रक्कम शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स (STCG) च्या अधीन असते.

एसटीपीचे प्रकार

स्थिर एसटीपी (Fixed STP) : फिक्सड् रक्कम हस्तांतरित केली जाते.
भांडवलवृद्धी (Capital Appreciation) : वाढलेले भांडवल हस्तांतरित केले जाते.
फ्लेक्सी एसटीपी (Flexi STP) : मूळ योजनेतून नवीन योजनेत रक्कम हस्तांतरित करू शकता.

एसटीपीद्वारे गुंतवणूक करताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी

  • एसटीपी जोखीम कमी करणारी योजना असली तरी जोखीम पूर्णपणे नाकारता येत नाही.
  • हाताशी पुरेशी रक्कम असल्यास आणि त्याची लगेच गरज नसेल तरच ती रक्कम एसटीपीमध्ये गुंतवा.
  • जेव्हा बाजारात तेजी असते तेव्हा भांडवल हस्तांतरित करण्याच्या भानगडीत सहसा पडू नये.