क्वान्टम एएमसीने (Quantum AMC) क्वान्टम स्मॉल-कॅप फंडाची घोषणा केली. हा फंड येत्या 16 ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. गुंतवणूकदारांना 27 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येईल. ही एक ओपेन-एंडेड इक्विटी योजना आहे जी प्रामुख्याने स्मॉल-कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करते. यात किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येईल.
स्कीम एस अँड पी बीएसई 250 स्मॉल-कॅप टोटल रिटर्न इंडेक्स विरुद्ध बेंचमार्क केली जाईल. त्याचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट स्मॉल-कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करून भांडवल वृद्धी करणे आहे. स्कीमची थेट आणि नियमित योजना असेल. फंड व्यवस्थापक स्मॉल-कॅप कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये 65%-100% वाटप करतील.
स्मॉल-कॅप फंड दीर्घकालीन भांडवल वृद्धी करु पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आहे. दीर्घ मुदतीत, स्मॉल-कॅप समभागांनी चांगला परतावा देण्याची क्षमता दर्शविल्याचे मागील काही वर्षात दिसून आले आहे.
गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळावा यासाठी आम्ही कमी ज्ञात, लहान व्यवसायांमध्ये वाढीच्या शक्यतांसह गुंतवणूक करु. कालांतराने, या कंपन्या त्यांचे उत्पन्न आणि कमाई वाढवतात, ज्यामुळे आमच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो, असे मत क्वांटम एएमसीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आणि निधी व्यवस्थापक चिराग मेहता यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “आजच्या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड क्षेत्रातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंटचा (एयूएम) मोठा आकार. मोठ्या एयूएम असलेल्या फंडांना स्मॉल-कॅप स्टॉकच्या मार्केट कॅपिटलायझेशनचा मोठा भाग असल्यास त्यांना लिक्विडीटीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांना अवास्तव वजनासह स्टॉकची लॉंग-टेल ठेवण्याची सक्ती केली जाऊ शकते. त्यांना एकतर रोख रक्कम खर्च न करता तशीच ठेवण्यास भाग पाडले जाऊ शकते किंवा ते मिड किंवा लार्ज-कॅप नावांमध्ये वृद्धीशील प्रवाहासह गुंतवावे लागते, जे स्मॉल-कॅप फंडाचे उद्दिष्ट नाही. क्वान्टम स्मॉल-कॅप फंड त्याच्या एयूएम आकाराला इष्टतम पातळीपर्यंत मर्यादित करेल, ज्यामुळे तो आशादायक स्मॉल-कॅप व्यवसायांचा हाय-कन्विक्शन, लिक्विड पोर्टफोलिओ ठेऊ शकतो.
आय.व्ही. सुब्रमण्यम, एमडी आणि समूह प्रमुख- इक्विटीज, क्वान्टम सल्लागार - क्वान्टम म्युच्युअल फंडाचे प्रायोजक, म्हणाले, “लोकसंख्येला भेडसावणार्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी उदयास आलेले अनेक नवीन स्टार्टअप्स अखेरीस स्मॉल-कॅप कंपन्या म्हणून सूचीबद्ध होऊ शकतात आणि शेवटी मिड-कॅप किंवा लार्ज-कॅप स्पेसमध्ये मोठ्या कंपन्यां म्हणून वाढू शकतात.
अर्थव्यवस्थेच्या वाढीचे नेतृत्व केवळ मोठ्या कंपन्याद्वारेच नव्हे तर गेल्या काही वर्षांत जन्मास आलेल्या अनेक स्टार्टअप्सच्या जलद वाढीमुळे देखील होईल. 2006 पासून क्वान्टम म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ व्यवस्थापन आणि बाजार परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता दर्शविणारा ट्रॅक रेकॉर्ड सिद्ध झाला आहे. म्हणून तो क्वान्टम स्मॉल-कॅप फंडासह त्याच्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये वाढ करण्यासाठी सुस्थितीत आहे. या योजनेचे उद्दिष्ट काळजीपूर्वक क्युरेट केलेल्या आणि वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओद्वारे कंपन्यांना एक्सपोजर प्रदान करणे आहे.”