Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dr. Vivek Bindra Net Worth: मोटिवेशनल स्पीकर डॉ.विवेक बिंद्रा आहेत 90 कोटींचे मालक!

vivek Bindra

Image Source : www.starzbio.com

डॉ. विवेक बिंद्रा यांची एकूण संपत्ती $11 दशलक्ष पेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे, जी 2023 मध्ये भारतीय रुपयात सुमारे 90 कोटींपेक्षा जास्त आहे. खूप कमी वयात त्यांनी मोठे यश संपादन केले आहे. केवळ भाषणे देऊन त्यांनी ही संपत्ती कमवली नसून उद्योगातून देखील त्यांनी स्वतःचा उत्कर्ष घडवून आणला आहे. जाणून घ्या डॉ. बिंद्रा यांची संपत्ती!

डॉ. विवेक बिंद्रा हे प्रभावी वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी त्यांची प्रेरक भाषणे ऐकली असतील. व्यवसायात आणि खासगी जीवनात अडीअडचणीचा सामना करताना कसे व्यवस्थापन केले पाहिजे याबद्दल ते माहिती देत असतात. त्यांचे चाहते केवळ भारतातच नसून परदेशातही आहेत. जगभरातून त्यांना भाषणासाठी निमंत्रणे येत असतात. परंतु प्रेरक भाषणे देणारे डॉ. बिंद्रा हे करोडपती आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? डॉ. बिंद्रा हे आलिशान जीवन जगतात ते केवळ त्यांच्या मेहनतीने. चला तर आज जाणून घेऊयात डॉ. विवेक बिंद्रा यांच्या एकूण संपत्तीबद्दल!

डॉ. विवेक बिंद्रा यांची एकूण संपत्ती $11 दशलक्ष पेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे, जी  2023 मध्ये भारतीय रुपयात सुमारे 90 कोटींपेक्षा जास्त आहे. डॉ. विवेक बिंद्रा यांचा जन्म 5 एप्रिल 1978 रोजी भारताची राजधानी, दिल्ली येथे झाला.खूप कमी वयात त्यांनी मोठे यश संपादन केले आहे. केवळ भाषणे देऊन त्यांनी ही संपत्ती कमवली नसून उद्योगातून देखील त्यांनी स्वतःचा उत्कर्ष घडवून आणला आहे. या लेखात तुम्हाला डॉ. बिंद्रा यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची आणि त्यांच्या स्थावर मालमत्तेची माहिती आम्ही देणार आहोत.डॉ. बिंद्रा श्रीमंत कसे बनले,त्यांच्याकडे असलेला कार संग्रह आणि या मालमत्तेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

व्यवसाय

डॉ. विवेक बिंद्रा हे सर्वात लोकप्रिय भारतीय YouTuber, प्रेरक वक्ते, कॉर्पोरेट ट्रेनर आणि यशस्वी उद्योजकांपैकी एक आहेत. ते बडा बिझनेसचे ( Bada Business) संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. डॉ. बिंद्रा यांनी त्यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील सेंट झेवीयर्स स्कुलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अमिटी युनिव्हर्सिटीमधून मॅनेजमेंट विषयात पदवी मिळवली.

पैशाचा स्त्रोत

डॉ. बिंद्रा हे YouTube वर कायम चर्चेत असतात. त्यांचे व्हिडियो करोडो लोक बघत असतात. वेगवेगळ्या कार्यक्रमातून, प्रायोजकत्व घेऊन, तसेच "Bada Business" आणि "ऑनलाइन कोर्स" अशा विविध स्रोतांद्वारे ते कमाई करतात.

विवेक बिंद्रा नेट वर्थ

2021 मध्ये त्यांची एकूण संपत्ती $7 दशलक्ष होती. डॉ. विवेक बिंद्राची 2023 मध्ये एकूण संपत्ती $11 दशलक्ष म्हणजेच भारतीय चलनात 90 कोटी इतकी आहे. त्यांनी त्यांच्या प्रेरक भाषणातून आणि त्यांच्या व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रमातून त्यांची बहुतेक संपत्ती निर्माण केली आहे. डॉ. विवेक यांचे जगभरातील वेगवेगळ्या  25 देशांत ग्राहक आहेत आणि ते 50 हून अधिक मोठमोठ्या कंपन्या हाताळतात. त्यांच्या प्रेरक व्याख्यानाने ते प्रत्येकजणाला खूश करतात आणि आत्मविश्वास देखील मिळवून देतात. विवेक बिंद्रा यांची ही घोडदौड अजूनही चालूच आहे. डॉ. बिंद्रा हे खूप महत्वकांक्षी असून त्यांना आयुष्यात खूप पुढे जायचे आहे असे ते आजही म्हणतात.

लेखाच्या पुढील भागात आपण, विवेक बिंद्रा यांचे एकूण उत्पन्नाचे स्रोत, कमाई, पगार, लक्झरी जीवनशैली, मालमत्ता, ब्रँड जाहिराती, महागड्या कारचे संकलन इत्यादींबद्दल चर्चा करणार आहोत.

विवेक बिंद्राची मालमत्ता

मीडिया रिपोर्टनुसार, विवेक बिंद्रा यांची संपत्ती भारतीय रुपयांमध्ये 90 कोटी आहे जी 2023 मध्ये $11 दशलक्ष यूएस इतकी आहे. तो अनेक व्हिडिओंद्वारे त्याच्या यूट्यूब चॅनेलवरून पैसे देखील कमवत आहे. डॉ. विवेक बिंद्रा हे वेगवेगळ्या कंपन्याच्या कर्मचाऱ्यांसाठी सत्र घेतात.या त्यांच्या सेमिनारमधून देखील ते पैसे कमवतात. आता नुकतेच त्याचे नवीन ऍप 'बडा बिझनेस' या नावाने लाँच केले आहे. डॉ. विवेक बिंद्रा हे जगभरातील अब्जावधी लोकांसाठी विशेषत: लहान व्यावसायिकांसाठी एक महान प्रेरणास्त्रोत आहेत.

त्यांचे वार्षिक उत्पन्न अंदाजे 10 कोटी आहे.

डॉ. विवेक बिंद्राची गेल्या 5 वर्षांपासून नेट वर्थ

  •  2023 मध्ये डॉ. विवेक बिंद्राची नेट वर्थ $11 दशलक्ष, म्हणजे 90 कोटी इतकी होती.
  • 2022 मध्ये विवेक बिंद्राची नेट वर्थ $6.5 दशलक्ष म्हणजेच 54 कोटी इतकी होती.
  • 2021 मध्ये विवेक बिंद्राची नेट वर्थ $6 दशलक्ष म्हणजेच 50 कोटी इतकी होती.
  • 2020 मध्ये विवेक बिंद्राची नेट वर्थ $4.3 दशलक्ष म्हणजेच 36 कोटी इतकी होती.
  • 2019 मध्ये विवेक बिंद्राची नेट वर्थ $4 दशलक्ष म्हणजेच 33 कोटी इतकी होती. त्यांचे मासिक उत्पन्न 46 लाखांपेक्षा अधिक आहे.

डॉ. विवेक बिंद्रा यांचे घर 

40 वर्षीय डॉ. विवेक बिंद्रा यांच्याकडे देशभरात विविध मालमत्ता आहेत. अलीकडेच त्यांनी दिल्लीत खूप मोठे घर घेतले आहे, जिथे ते आपल्या कुटुंबासह राहतात. त्याच्याकडे मुंबई आणि नोएडा येथे देखील मालमत्ता आहेत. या सगळ्यांच्या किंमती करोडोंमध्ये आहे.

डॉ. विवेक बिंद्रा यांचे कार कलेक्शन

डॉ. बिंद्रा यांच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. इथे आपण विवेक बिंद्राच्या कार कलेक्शनबद्दल चर्चा करूया.डॉ. बिंद्रा यांच्याकडे त्यांनी सर्वप्रथम घेतलेली मारुती सुझुकी स्विफ्टचे कार आजही आहे. सुमारे 3 लाख रुपये किमतीची ही कार त्यांनी खरेदी केली होती. सोबतच त्यांच्याकडे मर्सिडीज बेंझ देखील आहे. या कारची किंमत 39.00 लाख आहे आणि ही त्याच्या गॅरेजमधील सर्वात महागडी कार आहे. सोबतच वोल्वो XC90 ही कार देखील त्यांच्या संग्रही आहे.

डॉ. बिंद्रा यांचे सोशल मीडियावरील फॉलोअर्स

●YouTube Followers: 20.6 मिलियन 
●Facebook: 10 मिलियन
●Instagram: 3.4 मिलियन
●Twitter: 3.2 मिलियन

आपले खासगी आयुष्याबद्दल डॉ. बिंद्रा सार्वजनिक ठिकाणी फार कमी बोलतात. त्यांना दोन मुले असून ते शालेय शिक्षण घेत आहेत.