• 24 Sep, 2023 03:44

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MHADA Houses In Mumbai : मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी एका आठवड्यात 16 हजारांहून अधिक अर्ज

MHADA Houses In Mumbai

Image Source : www.mhada.gov.in

MHADA Houses In Mumbai : कोरोना टाळेबंदीमुळे मुंबईतील घरांची लॉटरी रखडली होती. अखेर म्हाडाकडून 22 मे 2023 रोजी मुंबईतील 4083 घरांसाठी लॉटरी जाहीर झाली. म्हाडाच्या 4083 घरांसाठी एका आठवड्यात 16,000 हून अधिक अर्ज जमा झाले आहेत.

Application Received For MHADA : मुंबईतील 4,083 घरांसाठी लॉटरी जाहीर झाल्यानंतर एका आठवड्यात म्हाडाकडे 16,000 हून अधिक अर्ज आले आहेत. या अपार्टमेंटची किंमत 24 लाख ते 7.57 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. घरांचा आकार 200 चौरस फूट ते 1,500 चौरस फूट इतका आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 जून आहे. लॉटरीचा निकाल 18 जुलै 2023 रोजी जाहीर केला जाईल.

लॉटरीचा निकाल 18 जुलैला

कोरोनामुळे अनेकदा रखडलेल्या मुंबईतील म्हाडाच्या घराची लॉटरी अखेर 22 मे 2023 रोजी काढण्यात आली. मुंबईसाठी घरांची लॉटरी जाहीर केल्यानंतर एका आठवड्यात, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाला 4,083 घरांसाठी 16,000 हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या घरांची किंमत 24 लाख ते 7.57 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. या घरांचा आकार 200 चौरस फूट ते 1500 चौरस फूट आहे.

शेवटचे अर्ज सादर करण्याची तारीख 26 जून आहे. लॉटरीचा निकाल 18 जुलै 2023 रोजी जाहीर केला जाईल. म्हाडाने रिअल इस्टेट बाजारात विक्रीसाठी ठेवलेली 4083 घरे सर्व विभागांसाठी आहेत. जसे की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग, निम्न उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटासाठी घरांची लॉटरी काढण्यात आली आहे.

म्हाडाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 4083 अपार्टमेंटसाठी 16,476 अर्ज प्राप्त झाले आहेत. यासाठी 7,665 अर्जदारांनी आधीच अॅडव्हान्स (बयाणा रक्कम) दिलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आलेला अनुभव असा आहे की, बहुतांश अर्ज शेवटच्या दोन आठवड्यांत जमा केले जातात. मात्र यावेळी उपलब्ध असलेल्या घरांच्या तुलनेत ही मागणी दुप्पट आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

पाइपलाइनमध्ये असलेले अपार्टमेंट

म्हाडाचे हे अपार्टमेंट विक्रोळी, अँटॉप हिल, गोरेगाव, दादर, वडाळा, अंधेरी भायखळा, मालाड, कांदिवली, तारदेव, जुहू, चेंबूर, पवई, चांदिवली आणि सायन या भागात पसरले आहेत. पूढील दोन वर्षांत प्राधिकरण एमआयजी आणि एचआयजी श्रेणींमध्ये आणखी अपार्टमेंटचे बांधकाम सुरू करणार आहे.

स्वस्त आणि महागड्या घरांच्या किमती

मुंबईच्या पवई परिसरातील चांदिवली येथील सर्वात स्वस्त अपार्टमेंट 204 चौरस फूटामध्ये असलेले 24.71 लाख रुपयांचे आहे. तर सर्वात महाग अपार्टमेंट दक्षिण मुंबईतील ताडदेव येथे 1,500 चौरस फुटांचे आहे, ज्याची किंमत 7.57 कोटी रुपये आहे.