Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bonus Shares Issued in 2022: गुंतवणूकदारांवर बोनस शेअर्सची खैरात, 16 वर्षांत पहिल्यांदाच सर्वाधिक कंपन्यांची घोषणा

Bonus Share Issue , Bonus Share

Bonus Share Issue : वाढती महागाई आणि भू-राजकीय तणाव यामुळे कमाई कमी होऊन शेअर मार्केटमधील परिस्थिती आव्हानात्मक असली तरी गुंतवणूकदारांना कंपन्यांनी बोनसच्या रुपात खूश केले आहे. बाजारातील सूचीबद्ध कंपन्या यंदा बोनस शेअर्सची खैरात वाटली आहे.

वाढती महागाई आणि भू-राजकीय तणाव यामुळे कमाई कमी होऊन शेअर मार्केटमधील परिस्थिती आव्हानात्मक असली तरी गुंतवणूकदारांना कंपन्यांनी बोनसच्या रुपात खूश केले आहे. बाजारातील सूचीबद्ध कंपन्या यंदा बोनस शेअर्सची खैरात वाटली आहे. एसीई इक्विटीजच्या आकडेवारीनुसार,  2022 मध्ये जवळपास 143 कंपन्यांनी बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. 2006 नंतरचा बोनस शेअर वाटपाची घोषणा करणाऱ्या कंपन्यांची संख्या सर्वाधिक आहे. 

बोनस शेअरमुळे गुंतवणूकदारांसाठी यंदाचे वर्ष चांगले गेले आहे. यापूर्वी 2006 मध्ये 152 कंपन्यांनी शेअर्स जारी केले होते. 2021 मध्ये जवळपास 120 कंपन्यांनी बोनस इश्यूची घोषणा केली होती. वर्ष 2019 आणि 2020 मध्ये अनुक्रमे 72 आणि 46 कंपन्यांनी बोनस शेअर वाटले होते. 

बोनसच्या इश्यूंमध्ये वाढ झाली (Increase in Bonus Issues)

विश्लेषकांनी सांगितले की, कर नियमांमध्ये बदल होण्यापूर्वी यावर्षी बोनस शेअर्सच्या इश्यूंमध्ये वाढ झाली आहे. बोनस स्ट्रिपिंगला लगाम लावण्यासाठी सरकारने फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पात प्राप्तिकर कायद्याच्या कलम 94 (8) मध्ये सुधारणा केली. 1 एप्रिल 2023 पासून नवीन नियम लागू होणार आहेत.

कंपन्या बोनस शेअर्स कधी जारी करतात? (When Do Companies issue bonus shares?)

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ.व्ही.के.विजयकुमार यांनी सांगितले की, कमकुवत मार्जिन आणि उच्च व्याजदराच्या पार्श्वभूमीवर हे वर्ष कमाईच्या दृष्टीकोनातून कठीण गेले असले तरी काही क्षेत्र आणि काही विशिष्ट कंपन्या चांगली कामगिरी करत आहेत. विश्लेषकांनी सांगितले की, कंपन्या वेगवेगळ्या उद्दीष्टांसह बोनस शेअर्सची घोषणा करतात. जेव्हा एखाद्या कंपनीच्या कामगिरीत काही वर्षांत शाश्वत सुधारणा होते, तेव्हा ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे शेअर्स असतात, त्यांना बक्षीस म्हणून बोनस शेअर्स जारी करण्याचा निर्णय व्यवस्थापन घेऊ शकते. प्रत्येक शेअरची कमाई टिकवून ठेवण्यासाठी पुढील दोन ते तीन वर्षांत त्याची कामगिरी सुधारण्याची अपेक्षा असताना कंपन्या बोनस शेअर्सही जारी करू शकतात, असे विश्लेषकांनी सांगितले.

या कंपन्यांनी वाटले बोनस शेअर (Companies Issued Bonus Share)

मदरसन सुमी वायरिंग इंडिया (MotherSon Sumi wiring India), शीला फोम (Sheela Foam), महाराष्ट्र सिमलेस (Maharashtra Seamless), इझी ट्रिप प्लॅनर (Easy Trip Planners), एफएसएन ई कॉमर्स व्हेंचर्स (FSN E Commerce Ventures), गेल इंडिया (Gail India), सोनाटा सॉफ्टवेअर (Sonata Software), आरईसी (REC), इंडियन ऑईल (Indian Oil), नझारा टेक्नोलॉजीज (Nazara Technologies), अजंता फार्मा (Ajanta Pharma) आणि एयू स्मॉल फायनान्स बँक (AU Small Finance Bank) अशा जवळपास 143 कंपन्यांनी बोनस शेअर इश्यू केले.