MODI GOVT PM JAN DHAN YOJNA BALANCE : 2014 मध्ये प्रधानमंत्री जन धन योजना सुरू करण्यात आली होती. आता या योजनेला 9 वर्षे 8 महिने पूर्ण झाले आहेत. या योजनेत शून्य शिल्लक रक्कम जमा असलेले खाते उघडण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून; लाभार्थ्यांनी जमा केलेल्या रकमेतही वाढ झाली आहे. आणि आता वर्ष 2023 मध्ये ही रक्कम ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढी जमी झाली आहे.
देशभरात 486 दशलक्ष लोकांनी उघडली खाती
यावेळी जनधन अंतर्गत उघडलेल्या खात्यांमध्ये जमा करण्यात आलेली रक्कम भारतीय रुपयानुसार २ लाख कोटी रुपये एवढी जमी झालेली आहे. प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार,देशभरात 486 दशलक्ष लोकांनी PMJDY अंतर्गत खाती उघडली आहेत. त्याचा लाभ घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये देखील नवीन लोकांनी 8 टक्के दराने खाती उघडली आहेत. नवीन खात्यांसह त्याच्या रकमेतही वाढ होताना दिसत आहे. मार्च 2022 मध्ये जन धन खात्यांमध्ये 1.95 ट्रिलियन जमा करण्यात आले होते.
ही योजना आणण्यामागील कारण
प्रधानमंत्री जन धन योजना 15 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आली होती. ज्याचा उद्देश देशातील प्रत्येक नागरिकाला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवणे, कमी उत्पन्न असलेल्या लोकांना बँक खात्यांशी जोडणे, असंघटित क्षेत्रातील नागरिकांनाही पेन्शन सुविधा उपलब्ध करून देणे, हे होते. प्रत्येक घरातील किमान एका सदस्याचे बँक खाते असले पाहिजे, त्यांनी बचत केली पाहिजे हा यामागचा मुख्य हेतु होता. जन धन खाते हे एक मूलभूत बचत बँक ठेव खाते आहे, जे खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड आणि ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील देते. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लाभार्थ्यांना या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही.
महिला लाभार्थ्यांची संख्या
जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या एकूण खात्यांपैकी 270 दशलक्ष खाती महिला लाभार्थ्यांची आहेत. जे एकूण खात्यांच्या 55 टक्के आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस (NSSO) च्या आकडेवारीनुसार, जर 92.4 टक्के पुरुषांच्या नावावर खाती आहेत, तर 86.4 टक्के महिलांच्या नावावर खाती आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, 32.88 कोटी जन धन योजना खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड जारी करण्यात आले आहेत.