Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mirae Asset Large Cap Fund: मिरे अ‍ॅसेट लार्जकॅप फंडाला 15 वर्ष पूर्ण, आतापर्यंत 14.7% दराने चक्रवाढ परतावा

Mutual Fund Investment

Mirae Asset mutual Fund: 15 वर्षात मिरे अ‍ॅसेट लार्ज कॅप फंडाने गुंतवणूकदारांना चक्रवाढ पध्दतीने गुंतवणूक निधीत 14.7% दराने वृध्दी मिळवून दिलेली आहे. फंडाच्या सुरुवातीला दहा हजार रुपये गुंतवणूक निधीचे मूल्य 4 एप्रिल 2023 ला 76 हजार 960 रुपये एवढे झालेले आहेत.

मिरे अ‍ॅसेट इनव्हेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (एएमसी) आणि कंपनीच्या प्रमुख फंडापैकी एक असलेल्या मिरे अ‍ॅसेटसेट लार्ज कॅप फंड (लार्ज कॅप फंडः लार्ज कॅप समभागांमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करणारी मुदतमुक्त समभाग योजना) यांनी 15 वर्षाचा महत्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. 15 वर्षात मिरे अ‍ॅसेट लार्ज कॅप फंडाने गुंतवणूकदारांना चक्रवाढ पध्दतीने गुंतवणूक निधीत 14.7% दराने वृध्दी मिळवून दिलेली आहे.  फंडाच्या सुरुवातीला दहा हजार रुपये गुंतवणूक निधीचे मूल्य 4 एप्रिल 2023 ला 76 हजार 960 रुपये एवढे झालेले आहेत.

भारतात अतिशय वेगाने वाढणाऱ्या फंड घराण्यात मिरे अ‍ॅसेटसेट इनव्हेस्टमेंट मॅनेजर्सचा समावेश आहे. 31 मार्च 2023 पर्यंत मिरे अ‍ॅसेट एएमसी (अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंट) तब्बल 1 लाख 16 हजार 311 कोटी रुपयांचे निधी व्यवस्थापन हाताळत आहे. यात 56 लाख 90 हजार फोलिओ समाविष्ट असून या फंडात दरमहा ‘एसआयपी’च्या माध्यमातून दरमहा 860 कोटींचा निधी गुंतविला जात आहे. एएमसी सध्या नऊ समभाग फंडाचे व्यवस्थापन पाहत आहे. त्यात गुंतवणूकदारांचा 93 हजार 613 कोटी रुपयांचा निधी संकलित झालेला आहे. त्याव्यतिरिक्त चार हायब्रिड फंड आणि त्यांचा आठ हजार 798 कोटी रुपयांचा निधी, अकरा डेट फंड आणि त्यांचा सहा हजार 633 कोटी रुपयांचा निधी, तीन इंडेक्स, तेरा ईटीएफ आणि आठ फंड ऑफ फंड योजना आणि या सर्वाचा एकत्रित निधी सात हजार 267 कोटी रुपये आहे.

एएमसीकडे असलेल्या नऊ समभाग फंड योजनांमध्ये सर्वात जुनी आणि निधी संचयात सर्वात मोठ्या असलेल्या मिरे अ‍ॅसेट लार्ज कॅप फंडाने चार एप्रिल 2023 ला तब्बल 15 वर्ष पूर्ण केले आहे. या फंडाकडे तीन एप्रिल 2023 अखेरीस 32 हजार 850 कोटी रुपयांचा निधी आहे. हा फंड प्रामुख्याने विविध क्षेत्रातील (बाजारमूल्याच्या दृष्टीने आघाडीच्या 100 कंपन्या) लार्ज कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करतो. तसेच या फंडासाठी निफ्टी 100 निर्देशांक हा पायाभूत निर्देशांक आहे. या फंडात 3 एप्रिल 2023 अखेर नऊ लाख 51 हजार 79 गुंतवणूकदारांचे फोलिओ कार्यरत आहेत.

फंडाच्या 15 वर्षाच्या दैदिप्यमान वाटचालीबद्दल बोलताना मिरे अ‍ॅसेटचे सीईओ आणि संचालक स्वरुप मोहंती म्हणाले की, जागतिक वित्तीय पेचप्रसंग आणि त्यामुळे भारत तसेच जगातील  शेअरबाजारांवर अनिश्चिततेचे ढग पसरलेले असताना मिरे अ‍ॅसेटने 2008 मध्ये आपल्या कामकाजाचा शुभारंभ केला होता. सर्वसामान्यांच्या मनात त्यावेळी बसलेल्या भितीवेळी कामकाज सुरु करणे हे खरोखर आव्हानात्मक होते, परंतु आता भुतकाळाचे अवलोकन केले असता त्यापेक्षा चांगला काळ असूच शकत नाही, असे वाटते. त्यातूनच मिरे अ‍ॅसेट या आमच्या ब्रॅण्डचे मूल्य आणि ताकद आपल्याला दिसून आली असून अशा कठिण प्रसंगीसुध्दा गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास आम्ही उंचावू शकते. केवळ भागीदार आणि गुंतवणूकदारांच्या अपेक्षांवर अवलंबून न राहता त्याही पुढे जात भारतातील आमचा प्रवास मजबूत करण्याची जबाबदारीही आमच्या चमूवर आलेली आहे. मिरे अ‍ॅसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रा. लिमिटेडमधील तज्ज्ञ चमूच्या वतीने गेल्या 15 वर्षांपासून आमचे भागीदार आणि गुंतवणूकदारांनी आम्हाला दिलेले सतत समर्थन आणि विश्वासाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, या शब्दांत मोहंती यांनी आभार मानले.

मिरे  अ‍ॅसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स इंडिया प्रा. लिमिटेडच्या समभाग विभागाचे सहप्रमुख गौरव मिश्रा म्हणाले की, मिरे अ‍ॅसेट पोर्टफोलिओमधील सर्वात मोठ्या फंडाचे व्यवस्थापन करणे आणि सातत्यपूर्ण परतावा देण्याचा प्रयत्न ही एक मोठी जबाबदारी आहे. आम्ही आमच्या भागीदारांचे आणि गुंतवणूकदारांनी कष्टाने कमावलेल्या पैशाचे संरक्षक आहोत, याची जाणीव ठेवतो. तसेच आम्ही मध्यम आणि दीर्घ मुदतीसाठी इष्टतम परतावा देण्याचा प्रयत्न करत असलो तरीही, आम्ही कमीतकमी भांडवल जतन करण्याच्या गरजेची जाणीव ठेवतो आणि जोखीम आणि परतावा यांच्यातील समतोलावर लक्ष केंद्रित करून, समभागांची निवड आणि पोर्टफोलिओ बांधणीचा आमचा सध्याचा गुंतवणूक दृष्टीकोन असाच सुरु ठेवत आलेला आहे. आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही आमच्या भागीदारांचे त्याचबरोबर गुंतवणूकदारांचे आभार मानतो.