Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

R-SETI: फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे व्यावसायिक प्रशिक्षण फायद्याचे; स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचा घ्या लाभ

R-SETI Training

R-SETI Training: महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आर-सेटी) च्या वतीने युवक आणि युवतींना फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन दिले जाते. आर-सेटीच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो युवकांनी फोटोग्राफी आणि व्हीडिओग्राफीचे प्रशिक्षण घेतले असून; त्यापैकी जवळपास 70 % युवकांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे.

Photography : ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारच्या वतीने युवकांनी स्वयंरोजगार निर्माण करावा यासाठी विविध योजना अंमलात आणल्या जातात. याचअंतर्गत जिल्हा पातळीवर महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 18 ते 45 वयोगट असलेल्या युवक-युवती आणि महिला तसेच पुरुषांकरिता विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. याचअंतर्गत 30 दिवसांचे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षणार्थींना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन दिले जाते.

फोटोग्राफी व्यवसायासाठी प्रशिक्षण

फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीला व्यावसायिकांना नेहमीच मागणी असते.  जाहिरातीचे शूट, वेडिंग शूट, प्री वेडिंग शूट, बर्थडे फोटोग्राफी, न्यू बॉर्न बेबी शूट, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी इत्यादी प्रकारच्या फोटोग्राफी आणि व्हिडिओच्या कामासाठी मार्केटमध्ये या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केल्यास हरकत नाही. यासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून प्रशिक्षणही दिले जाते.  अनेक युवकांनी आर-सेटी मधून प्रशिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे.

एका कॅमेऱ्यासह व्यवसायाची सुरुवात

फोटोग्राफी व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला एका कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुरुवात करता येते. व्यवसाय सुरु करण्यास लागणारे भांडवल हे व्यवसाय उभारणारा व्यक्ती कशा प्रकारचा कॅमेरा घेतो यावर अवलंबून असते. तसेच, जर त्या व्यक्तीने फोटो स्टूडिओ उभारायचा ठरविल्यास तो कुठे आणि किती किंमतीला घेतला गेला आहे, यावर हा संपूर्ण व्यवसाय उभारण्यास किती गुंतवणूक करावी लागेल? या गोष्टी अवलंबून असतात.  तसेच दुसरा पर्याय म्हणजे कुठलाही फोटो स्टूडिओ न उभारता केवळ सोशल मीडियाद्वारे मार्केटिंग करुन देखील ऑर्डर घेऊन हा व्यवसाय सुरु केला जाऊ शकतो. यापद्धतीने व्यवसाय सुरु केल्यास खर्च कमी येतो.

कॅमेऱ्याची किंमत काय?

एका साधारण कॅमेऱ्याची किंमत 50 ते 80 हजार रुपयांपासून सुरु होत असते. परंतु कुठल्याही कॅमेऱ्याचा संपूर्ण खेळ हा त्याच्या लेंसेस वर अवलंबून असते. त्यामुळे लेंस नुसार त्याची किंमत ठरत असते.  कॅनॉन कंपनीचा EOS 1500D 24.1MP DSLR कॅमेरा ज्यामध्ये EF-S 18-55mm IS II Lens असतात. तो मार्केट मध्ये 41 हजार 989 रुपयांना येतो. तर सोनी कंपनीचा Sony a7 IV 33MP Mirrorless Camera हा 2 लाख 18 हजार 489 रुपयांना येतो. तसेच Sony ALPHA ILCE-7M2K Mirrorless Camera (Body with SEL28-70 Lens) हा कॅमेरा 81 हजार 990 रुपयांना मिळतो. तर Nikon Z8 45.7MP Mirrorless Camera ची किंमत 3 लाख 43 हजार 995 रुपये आहे. तर सगळ्यात महागडा C 100 Canon कॅमेऱ्याची किंमत 5.50 लाख रुपये आहे.

मोबाइलमुळे झाले महत्व कमी

सध्याच्या आधुनिक युगात आता अँड्रोइड आणि आयफोन मोबाईल मध्येच उत्तम असे मेगा फिक्सलचे कॅमेरे उपलब्ध असतात. त्यामुळे आजच्या युगातील 80 % लोक हे क्षणोक्षणी फोटो काढून आपल्या आयुष्याचे सुंदर असे क्षण कॅमेऱ्यात कैद करीत असतात. त्यामुळे कुठे ना कुठे या फोटोग्राफीच्या व्यवसायावर संकटाचे सावट उभे राहतांना दिसते. परंतु, दुसरी बाजू बघितल्यास ग्राफिक्स आणि व्हिडिओ एडिटींग क्षेत्रात आलेल्या अत्याधूनिक फिचर्समुळे हा व्यवसाय तग धरुन आहे. तसेच फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करतांना अंमलात आणल्या जाणाऱ्या नवनवीन कल्पना यामुळे दिवसेंदिवस याचे महत्व वाढतच जात असलेले आपण बघत आहोत.