Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MHADA Lottery 2023: म्हाडाचा अर्ज भरताना कोणत्या उत्पन्न गटासाठी किती अनामत रक्कम भरावी लागेल, जाणून घ्या

Mhada Lottery 2023

MHADA Lottery 2023: ऑनलाईन पद्धतीने म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताना अर्जदाराला अनामत रक्कम (Deposit Amount) भरावी लागते. प्रत्येक उत्पन्न गटानुसार ती रक्कम वेगवेगळी असते. कोणत्या उत्पन्न गटासाठी किती अनामत रक्कम भरावी लागेल, तसेच अर्जाचे शुल्क किती असेल? जाणून घेऊयात.

म्हाडाने मुंबई विभागासाठी 4083 घरांची लॉटरी (Mhada Housing Lottery 2023) काढली आहे. तुम्ही देखील मुंबई घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. सध्या म्हाडाच्या घरासाठी अर्ज (Registration Process) करण्याची प्रक्रिया साधी आणि सोपी बनवण्यात आली आहे. मोजक्या कागदपत्रांची पूर्तता केल्यावर आणि संगणकीय प्रणालीत उत्तीर्ण झाल्यावर लगेच म्हाडाकडून घराची पूर्तता करता येते. मात्र हा टप्पा ओलांडण्यासाठी अर्जदाराने पात्रतेचे निकष पूर्ण करणे गरजेचे आहे.

ऑनलाईन पद्धतीने म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताना अर्जदाराला अनामत रक्कम (Deposit Amount) भरावी लागते. प्रत्येक उत्पन्न गटानुसार ती रक्कम वेगवेगळी असते. कोणत्या उत्पन्न गटासाठी किती अनामत रक्कम भरावी लागेल तसेच अर्जाचे शुल्क किती असेल? जाणून घेऊयात.

लॉटरीच्या अर्जाचे शुल्क जाणून घ्या

म्हाडाच्या घरासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना हल्ली केवळ 7 कागदपत्रं सादर करावी लागतात. या कागडपत्रांसोबत अर्जदाराला अर्ज आणि अनामत रक्कम भरून द्यावी लागते. ही रक्कम अत्यल्प उत्पन्न गट (Economic Weaker Section-EWS), अल्प उत्पन्न गट (Lower Income Group-LIG), मध्यम उत्पन्न गट (Middle Income Group-MIG) आणि उच्च उत्पन्न गटासाठी (Higher Income Group-HIG) वेगवेगळी असते.

म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्जदाराला अर्ज करावा लागतो. त्यासाठी अर्जाचे शुल्क 500 रुपये निश्चित करण्यात आले आहे. ज्यावर 18% जीएसटी (GST) भरावा लागतो. ही जीएसटीची रक्कम 90 रुपये आहे. या दोन्ही रकमा मिळून अर्जासाठी अर्जदाराला 590 रुपये भरावे लागणार आहेत. ही रक्कम विना परतावा स्वरूपात मोडली जाते.

उत्पन्न गटानुसार अनामत रक्कम जाणून घ्या

अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदाराला  25,590 रुपये अनामत रक्कम भरावे लागणार आहेत. तर याच उत्पन्न गटातील अर्जदार जर प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अर्ज भरणार असेल, तर 10,590 रुपये अनामत रक्कम भरावी लागेल.अल्प उत्पन्न गटातील लोकांना म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज केल्यावर 50,590 रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

तर मध्यम उत्पन्न गटातील लोकांना 1,00,059 रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. उच्च उत्पन्न गटात जर अर्जदार अर्ज करणार असेल, तर त्यासाठी तुम्हाला 1,50,590 रुपये भरावे लागणार आहेत. अनामत रकमेच्या पेमेंट वितरणामध्ये योग्य पर्यायाची निवड करून अनामत रक्कम व अर्ज शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्जदार 22 मे पासून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत 26 जून रात्री 11 वाजून 59 मिनिटांनी असणार आहे. NEFT किंवा RTGS पद्धतीने अर्जदार देण्यात आलेल्या वेळेत पेमेंट करू शकतात.