Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MHADA Lottery: प्रधानमंत्री आवास योजनेतून अर्ज करण्यासाठीची पात्रता व नियम समजून घ्या

Mhada Lottery 2023

Image Source : wwweenews.india.com

Mhada Lottery 2023: प्रधानमंत्री आवास योजने (PMAY) अंतर्गत म्हाडा लॉटरीतून घरासाठी अर्ज करता येतो. त्यासाठी अर्जदाराच्या पात्रतेच्या नियम व अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. ठराविक उत्पन्न गटातील अर्जदार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

Mhada Lottery 2023: म्हाडाची मुंबई विभागासाठी 4083 घरांची लॉटरी निघाली आहे. 22 मे पासून यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया (Registration Process) सुरू झाली असून याची अंतिम तारीख 26 जून पर्यंत असणार आहे. म्हाडाच्या या लॉटरीमध्ये वेगवेगळ्या उत्पन्न गटातील लोकांसाठी राखीव घरे ठेवण्यात आली आहेत. अत्यल्प उत्पन्न गट (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन्न गट (MIG) आणि उच्च उत्पन्न गट (HIG) अशी उत्पन्न गटाची निर्मिती करण्यात आली आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील (EWS) लोक प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी अर्जदाराच्या पात्रतेच्या नियम व अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या समजून घेणे गरजेचे आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठीच्या अटी

1) अर्ज करणारी व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबातील पती/ पत्नी व अविवाहित मुलांच्या नावाने भारतात कुठेही पक्के घर नसावे. 

2) अर्ज करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत (PMAY) नोंदणी असणे किंवा नोंदणी करणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नोंदणी केलेली असल्यास नोंदणी क्रमांक (Registration Number) अर्जामध्ये नमूद करणे गरजेचे आहे. तथापि नोंदणी नसल्यास लॉटरीमध्ये यशस्वी झाल्यास नोंदणी करणे गरजेचे आहे.  

3) ही नोंदणी करण्याची प्रक्रिया मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ स्तरावर नियुक्त केलेल्या संस्थेद्वारे करण्यात येत आहे. त्याकरिता नियमानुसार लागणारे शुल्क विजेत्याला भरणे आवश्यक आहे.

4) प्रधानमंत्री आवास योजने (PMAY) अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांसाठी अर्जदाराच्या, कुटुंबामध्ये पती-पत्नी व अविवाहित मुल यांचा समावेश असेल. तसेच घरासाठी कुटुंबातील कर्त्या महिलेच्या किंवा कर्त्या पुरुष व महिला यांच्या संयुक्त नावे वितरण करण्यात येईल. 

5) दिनांक 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीतील अर्जदाराचे स्वतःचे व त्याच्या पत्नी या दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न (Annual Income) 3 लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

6) जर अर्जदार, पती किंवा पत्नी दोघेही लॉटरीमध्ये यशस्वी झाले, तर त्याला किंवा तिला कोणतेही एकच घर घेण्याची परवानगी मिळते. 

7) जर अर्जदाराने प्रधानमंत्री आवास योजने (PMAY) अंतर्गत घर घेतले असेल, तर त्या घराची पुनर्विक्री, घराचा ताबा मिळाल्यापासून 10 वर्ष करता येत नाही.

8) यशस्वी अर्जदारांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार इतर आवश्यक करांचा भरणा (Pay Tax) करणे बंधनकारक असणार आहे.