Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MHADA Lottery 2023: मुंबईबाहेरील अर्जदार म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करू शकतो का? जाणून घ्या नियम

Mhada Lottery 2023

Image Source : www.dnaindia.com

MHADA Lottery 2023: तुम्हाला देखील मुंबईत स्वतःचे घर खरेदी करायचे आहे? पण तुम्ही मुंबईत राहत नसून महाराष्ट्रातील दुसऱ्या कोणत्या तरी जिल्ह्यात राहत आहात, तर अशा वेळी मुंबईतील म्हाडाच्या घरासाठी तुम्ही अर्ज करू शकता की नाही, ते जाणून घेऊयात.

म्हाडाने मुंबई विभागासाठी 4083 घरांची लॉटरी 22 मे रोजी काढली आहे. या लॉटरीसाठी 26 जूनपर्यंत अर्ज (Registration for Mhada Lottery 2023) करता येऊ शकतो. ठराविक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आणि संगणकीय प्रणालीद्वारे कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर अर्जदाराला घर उपलब्ध करून देण्यात येते. तुम्हाला देखील मुंबईत स्वतःचे घर खरेदी करायचे आहे? पण तुम्ही मुंबईत राहत नसून महाराष्ट्रातील दुसऱ्या कोणत्या तरी जिल्ह्यात राहत आहात, तर अशा वेळी मुंबईतील म्हाडाच्या घरासाठी तुम्ही अर्ज करू शकता की नाही. त्याचे नियम काय आहेत, ते समजून घेऊयात.

'या' दोन गोष्टीची पूर्तता करणे गरजेचे

अनेकांना म्हाडा लॉटरीमध्ये घर खरेदी करण्याची इच्छा असते. मात्र अनेकदा पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने ती संधी हुकते. म्हाडाचे घर त्याच व्यक्तीला मिळते. जी व्यक्ती पात्रतेच्या अटींची पूर्तता करते. या अटीनुसार, मुंबईतील म्हाडाच्या घरासाठी अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी असणे बंधनकारक आहे.

अर्जदाराने लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग 20 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये किमान 15 वर्ष सलग वास्तव्य केलेले असणे गरजेचे आहे. तसेच त्या ठिकाणचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) अर्जदारकडे असणे गरजेचे आहे.

अर्जदाराकडे किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेकडून, राज्य किंवा केंद्र शासनाच्या गृहनिर्माण योजनेतून किंवा आवास योजनेतून घराचा लाभ घेतलेला नसेल तर आणि तरच अर्जदार लॉटरीसाठी पात्र ठरतो. तुम्ही मुंबईत राहत नसला, तरीही मुंबईतील  म्हाडाच्या घरासाठी अर्ज करू शकता आणि घर मिळवू शकता.

म्हाडाच्या लॉटरीसाठी अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन

1) म्हाडाच्या www.housing.mhada.gov.in या वेबसाईटवर जा.

2) होमपेजवर रजिस्ट्रेशनचा फॉर्म दिसेल. त्या फॉर्मधील माहिती एक-एक करून भरा.

3) सर्वप्रथम आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाका. तो टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. तो व्हेरिफाय करा.

4) मोबाईलवरील ओटीपीप्रमाणेच तुमच्या ई-मेल आयडीवरही ओटीपी येईल. तो व्हेरिफाय करा.

5) रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला आधार कार्डची डिजिटल प्रत अपलोड करावी लागेल. आधारकार्डच्या दोन्ही  बाजुंची प्रत अपलोड करावी लागते.

6) आधारकार्डप्रमाणेच अर्जदाराला पॅनकार्डची प्रतसुद्धा रजिस्ट्रेशनसाठी अपलोड करावी लागेल. ही प्रत स्पष्ट असेल, याची अर्जदारांनी काळजी घ्यावी.

7) अर्जदाराचे लग्न झाले असेल तर त्याला जोडीदाराचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड अपलोड करणे बंधनकारक आहे.

8) म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणारी व्यक्ती ही महाराष्ट्रातील रहिवासी असणे बंधनकारक आहे. त्यासाठी अर्जदाराने किमान मागील 5 वर्षांपासून महाराष्ट्रात राहत असल्याचा पुरावा सादर करणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईस सर्टीफिकेट अपलोड करावे लागते.

9) अर्जदार जर इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरत असेल तर त्याने मागील वर्षाची रिटर्न भरल्याची प्रत अपलोड करणे गरजेचे आहे. फॉर्म 16 किंवा सॅलरी स्लिप चालणार नाही.

10) अर्जदाराची पती/पत्नी जर नोकरी करत असेल तर त्याचाही आयटीआर अपलोड करावा लागेल.

11) अर्जदार कोणत्या गटातून अर्ज भरणार आहे; हे निश्चित करण्यासाठी अर्जदाराला उत्पन्नाचा पुरावा सादर करणे गरजेचे आहे. यामध्ये अर्जदार तहसिलदाराकडून उत्पन्नाचा दाखला मिळवून अपलोड करू शकतो.

12) अर्जदार जर एका विशिष्ट प्रवर्गातून अर्ज भरणार असेल, जसे की, SC, ST, NT, DT, VJ  यासाठी अर्जदाराला जातीचा दाखला अपलोड करणे गरजेचे आहे.

13) तसेच अर्जदाराला स्पेशल कॅटेगरीतूनही अर्ज भरण्याची सुविधा यामध्ये आहे. अर्जदार कलाकार, पत्रकार, स्वातंत्रसैनिक, सेवानिवृ्त्त कर्माचारी, मिलेटरीमधून निवृत्त झालेले जवान, आमदार, खासदार, दिव्यांग व्यक्ती अशा कॅटेगरीतून अर्ज भरू शकतो. यासाठी अर्जदाराला संबंधित कॅटेगरीचा पुरावा सादर करणे गरजेचे आहे.