New Comet EV: EV सेगमेंटमध्ये अधिक संधी पाहून एमजी मोटर ग्राहकांना आणखी पर्याय देण्याची तयारी करत आहे. नुकत्याच दाखल झालेल्या New MG EV पेटंटने चिनी बाजारात विकल्या जाणाऱ्या बाओजुन येप इलेक्ट्रिक मिनी-SUV प्रमाणे दिसणार्या नवीन छोट्या EV चे डिझाइन ग्राहकांपूढे आणले आहे.
एमजी मोटरने नवीन मायक्रो-ईव्ही डिझाइन पेटंट दाखल केले आहे. सुपर-कॉम्पॅक्ट आणि एमजी कॉमेट ईव्हीच्या तुलनेत, नवीन एमजी स्मॉल ईव्हीमध्ये अधिक मस्क्यूलर प्रोफाइल आहे. ही गाडी पारंपारिक एसयूव्हीच्या आकार प्रमाणे दिसते. परंतु New MG EV चा आकार लहान आहे.
डाइमेंशन आणि डिझाइन
तसेच, बाओजुन येपशी तुलना केल्यास बाओजुन येपचे सर्व रिझल्ट कॉमेट EV पेक्षा जास्त आहेत. त्याची लांबी 3,381 मिमी, रुंदी 1,685 मिमी आणि उंची 1,721 मिमी आहे. त्याचा व्हीलबेस 2,110 मिमी आहे. MG चे नवीन डिझाईन पेटंट बाओजुन येप सारखे आहे. याचा अर्थ असा आहे की, ही नवीन EV Baojun Yep ची रिबॅज केलेली आवृत्ती असू शकते. New MG EV मध्ये बॉक्सी डिझाईन, स्क्वेअर फ्रंट ग्रिल, स्क्वेअर एलईडी हेडलाइट्स, बम्पी बंपर आणि शार्प डिझाइनसह फ्लॅट बोनेट यांचा समावेश आहे. साइड प्रोफाईलला व्हील आर्च, जाड क्लेडिंग, ब्लॅक-आउट ए-पिलर आणि फंक्शनल रूफ रेल दिल्या गेले आहेत.
इंटिरियर आणि पॉवरट्रेन
कॉमेट EV चे डिझाईन खूपच आकर्षक दिसते. याला आतील बाजूस अधिक जागा, दुहेरी मोठ्या स्क्रीन आणि सेंट्रल एसी व्हेंटच्या खाली काही पारंपारिक कंट्रोल बटणांसह एक साधे इंटीरियर डिझाइन मिळेल. त्याची रेंज, स्पेसिफिकेशन आणि परफॉर्मन्स देखील Baojun Yep EV सारखे असू शकतात. ज्यामध्ये मागील एक्सल इलेक्ट्रिक मोटर 28.1 kWh बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे. हे 67 bhp ची कमाल पॉवर आणि 140 Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. त्याची रेंज 303 किमी असल्याचा दावा केला जात आहे. त्याचा टॉप स्पीड 100 किमी प्रतितास आहे.
ICE इंजिन मिळू शकते
New MG EV मध्ये ICE इंजिन सिंगल-सिलेंडर युनिट असू शकते, जे सुमारे 13.5 bhp कमाल पॉवर जनरेट करेल. यामुळे कारची रेंज सुमारे 80 किमीने वाढेल. त्याची इंधन क्षमता 5 ते 10 लिटर असू शकते. MG ची नवीन छोटी ईव्ही 2025 मध्ये लाँच केली जाऊ शकते.