कोअर लक्झरी सेगमेंटमधलं सर्वात लोकप्रिय मॉडेल जीएलसी एसयूव्हीशिवाय (GLC SUV) हे रेकॉर्ड झालं आहे. याचं सेकंड जनरेशन मॉडेल लवकरच लॉन्च केलं जाणार आहे. दरम्यान, दीड वर्षातली ही कंपनीची आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे. मागच्या 6 महिन्यांतली आकडेवारी ही विक्रीतली सातत्यानं होणारी वाढ दर्शवणारी आहे.
Table of contents [Show]
मागच्या वर्षीपेक्षा चांगली कामगिरी
दुसर्या तिमाहीत (एप्रिल-जून 2023), कंपनीच्या ऑर्डर बुकनं पहिल्या तिमाहीची ताकद कायम ठेवली. बुकिंगनं 3,500 युनिटचा टप्पा ओलांडल्याचं दिसून येत आहे. दुसऱ्या तिमाहीतली विक्रीदेखील 3,831 युनिट्सची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट होती. 2022मधल्या याच कालावधीपेक्षा ती 8 टक्के जास्त आहे.
कंपनीनं काय म्हटलं?
कंपनीच्या 6 महिन्यांच्या विक्री कामगिरीचा आढावा घेत असताना मर्सिडीज-बेंझ इंडियाचे एमडी संतोष अय्यर म्हणाले, की ही विक्रमी विक्रीची कामगिरी म्हणजे ब्रँडची विश्वासार्हता, एक आकर्षक पोर्टफोलिओ, कारची वाढती उपलब्धता आणि रिटेल ऑफ द फ्यूचर बिझनेस मॉडेलच्या सक्सेसफूल इम्लिमेंटच्या कारणामुळे आहे.
येणार आणखी लक्झरी व्हेइकल्स
ग्राहकांना चांगला अनुभव देणं आणि टॉप-एंड वाहनं वाढवणं यावर आम्ही आमचं लक्ष केंद्रित केलं आहे. आता येत्या तिमाहीतल्या विक्रीच्या आकड्यांबद्दलदेखील आम्ही खूप उत्सुक आहोत. कारण आम्ही आमच्या ग्राहकांसाठी काही बहुप्रतिक्षित लक्झरी व्हेइकल्स आणणार आहोत. याची सुरुवात आम्ही न्यू जनरेशन जीएलसीसोबत करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
मर्सिडीज-बेंझ इंडिया - स्प्लीट सेल्स
ईक्यीबी (EQB) आणि (EQS) यासारख्या नवीन मॉडेल्सच्या समावेशामुळे बॅटरी-इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 10 पटीनं वाढली, तर टॉप-एंड व्हेइकल सेगमेंटची विक्री या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत 50 टक्क्यांपेक्षा अधिकनं वाढ झाली. याची किंमत जवळपास 1.5 कोटींहून अधिक आहे.
कोणत्या गाड्यांना ग्राहकांची मागणी?
वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मर्सिडीज-बेंझसाठी सर्वात खास बात म्हणजे जीएलएस (GLS), एस क्लास (S-Class), एक क्लास मेबॅच (S-Class Maybach), जीएलएस मेबॅच (GLS Maybach) आणि एएमजी जी 63 (AMG G63) यांना ग्राहकांची चांगली मागणी आहे. एलडब्लीबी ई क्लास (LWB E-Class) हे कंपनीसाठी सर्वात जास्त विकलं जाणारं मॉडेल आहे. तर जीएलई ही सर्वात जास्त विक्री होणारी एसयूव्ही (SUV) आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            