Mercedes New G-Class SUVs : जर्मन कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने भारतात नवीन जी-क्लास एएमजी लाइन आणि अॅडव्हेंचर एडिशन लॉन्च केले आहे. या दोन्ही कार एकाच एक्स-शोरूम किमतीत लाँच केल्या गेल्या आहेत, या कारची किंमत 2.55 कोटी रुपये आहे. जी-क्लास ही 40 वर्षांहून अधिक काळ विकली जाणारी कार आहे आणि सध्या ती सर्वात आलिशान लक्झरी ऑफ-रोडर म्हणून ओळखली जाते.
SUV - G 400d AMG Line आणि G 400d Adventure Edition या दोन्ही कार 1.5 लाख रुपयांना बुक करता येईल. बुकिंग करीता आधीच्या मर्सिडीज-बेंझ मालकांना प्राधान्य दिले जाणार आहे. कंपनी या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत डिलिव्हरी सुरू करणार आहे.
टॉप स्पीड 210 किमी प्रतितास
SUV - G 400d AMG Line आणि G 400d Adventure Edition चे दोन्ही प्रकार सहा-सिलेंडर डिझेल इंजिनसह येतात. जे स्वयंचलित गिअरबॉक्सच्या मदतीने 326bhp आणि 700Nm टॉर्क जनरेट करतात. या दोन्ही गाड्या 6.4 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठण्यास सक्षम आहेत आणि त्यांचा टॉप स्पीड 210 किमी प्रतितास आहे.
इतिहासातील सर्वात शक्तिशाली डिझेल इंजिन
डिझेल इंजिन (OM656) हे मर्सिडीज-बेंझच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली डिझेल इंजिन आहे. G-Class च्या Adventure Edition मध्ये रूफ रॅक, काढता येण्याजोगे शिडी, स्पेअर व्हील होल्डर, 18-इंच अलॉय व्हील, फुल-साईज स्पेअर व्हील, लेदर इंटिरियर्स यासह अनेक वैशिष्ट्ये असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये
जी-क्लास अॅडव्हेंचर एडिशन एकूण 25 रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्यापैकी 4 विशेष रंग सगळ्यात जास्त चालणारे आहेत. तर, नावाप्रमाणेच, AMG लाइन हा त्याचा स्पोर्टियर प्रकार आहे. यात 20-इंच अलॉय व्हील, बर्मेस्टर सराउंड साउंड सिस्टम,स्लाइडिंग सनरूफ, 64 रंगांमध्ये सभोवतालची प्रकाश व्यवस्था आणि एक वाइडस्क्रीन कॉकपिट आहे.