Mercedes Benz GLC SUV Will Be Launched: मर्सिडीज बेंझने भारतात 6 जानेवारी रोजी Mercedes AMG E53 Cabriolet हे नवीन मॉडेल लाँच केले होते. आता कंपनी येत्या 9 ऑगस्ट रोजी Mercedes Benz GLC SUV कार लाँच करत आहे. महत्वाचे म्हणजे कुणीही ग्राहक केवळ 1,50,000 रुपये भरून त्याची Mercedes Benz GLC SUV गाडी बुकिंग करू शकतो.
परवडणाऱ्या चारचाकी वाहनांसोबतच लक्झरी वाहनांची बाजारपेठही भारतात मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी, बाजारपेठेतील आघाडीच्या लक्झरी कंपन्या त्यांची नवीन उत्पादने दररोज बाजारात आणत असतात. या मालिकेत (Variant) लक्झरी ऑटोमोबाईल कंपनी मर्सिडीज बेंझने आपल्या संपूर्ण नवीन मर्सिडीज बेंझ जीएलसी एसयूव्ही गाडीचे बुकिंग सुरू केले आहे.
येथे करता येईल बुकिंग
मर्सिडीज इंडियाने नवीन GLC SUV बुक करण्यासाठी दोन पर्याय दिले आहेत, जेणेकरुन ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. एकीकडे ग्राहक ही गाडी मर्सिडीज इंडियाच्या देशव्यापी फ्रँचायझी भागीदार नेटवर्कद्वारे (Franchise Partner Network) बुक करू शकतात. दुसरीकडे, ग्राहक मर्सिडीज ऑनलाइन स्टोअरद्वारे बुकिंग करू शकतात.
दोन प्रकार करणार लाँच
यावेळी मर्सिडीज कंपनी आपल्या नवीन GLC SUV चे दोन प्रकार बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. पहिला प्रकार GLC 300 4MATIC आहे. दुसरा प्रकार GLC 220d 4MATIC आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, GLC SUV चे हे दोन्ही प्रकार कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर सुरळीत चालताना दिसतील. कंपनीने या दोन्ही प्रकारांमध्ये अॅडव्हान्स ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टीम दिलेली आहे.
काय असणार वैशिष्ट्ये
मर्सिडीज कंपनीने आपल्या नवीन GLC SUV च्या दोन्ही प्रकारांमध्ये शक्तिशाली इंजिनसह एकात्मिक स्टार्टर जनरेटरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय 9G ट्रॉनिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देखील देण्यात आले आहे. याशिवाय, कंपनी आपल्या नवीन मॉडेलमध्ये नवीनतम NTG 7 टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम ऑफर करत आहे. गाडीच्या इंटिरिअरमध्ये कंपनीने 12.3-इंचाचा इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले आणि 11.9-इंचाचा पोट्रेट इन्फोटेनमेंट डिस्प्ले दिला आहे. या नवीन GLC मध्ये पूर्वीपेक्षा जास्त प्रवाशांना बसण्याची जागा मिळेल, असे कंपनीचे म्हणणे आहे.