Auto Sector: वाहन क्षेत्रातील विक्री वाढल्याने नफ्यात वाढ झाली. त्यामुळे ऑटो क्षेत्रातील कंपन्यांनी पगारवाढ देण्यास सुरुवात केली आहे. कर्मचाऱ्यांना 16 टक्क्यांपर्यंत पगारवाढ मिळाली आहे. टाटा, मारुतीसारख्या बड्या कंपन्यांनीही प्रमोशन आणि बोनस दिले आहेत. आर्थिक वर्ष 2023 मध्ये, देशांतर्गत बाजारपेठेत प्रवासी वाहनांची विक्री एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 27% ने वाढून विक्रमी 3.89 दशलक्ष युनिट्सवर पोहोचली आहे. दुचाकींची विक्रीही दुहेरी अंकाने वाढून 15.9 दशलक्ष झालेली आहे.
मारुती कंपनी
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुतीने यावर्षी सरासरी 14-15% पगारवाढ दिली आहे. यात गुणवत्ता वाढ, बाजार सुधारणा आणि पदोन्नती लाभचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. कंपनीने मागील आर्थिक वर्षातील व्यावसायिक कामगिरीनुसार बोनसही दिला आहे.
कर्मचार्यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांमुळे, Maruti Suzuki ने आर्थिक वर्ष 2023 मध्ये चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंतची सर्वाधिक उलाढाल 1 लाख कोटीं पर्यंत पोहचली आहे. 'आमची १९.६६ लाख युनिट्सची विक्री आतापर्यंतची सर्वाधिक आहे. कंपनी कर्मचार्यांच्या प्रयत्नांची जाणीव ठेऊन, त्यांच्या चांगल्या कामाचे प्रतिफळ पगारवाढीच्या रूपात देत आहे, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ह्युंदाई मोटर इंडिया
Hyundai Motor India ने कर्मचाऱ्यांच्या पगारात 13-16% वाढ केली आहे. Hyundai यावर्षी लाँच केलेले विविध मॉडेल्स ग्राहकांच्या पसंतीस पडल्याने, कंपनीला चांगला नफा झाला आहे. त्यामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांना उत्तम पगारवाढ दिलेली आहे.
हिरो मोटोकॉर्प
Hero MotoCorp च्या प्रवक्त्याने सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढ जास्त आहे. आम्ही एक विशिष्ट टार्गेट ठेवून पूढे जात आहे. आमच्या वार्षिक भरपाई पुनरावलोकन प्रक्रियेमुळे (Annual Compensation Review Process) आर्थिक वर्ष 2023 मध्ये उद्योगातील सर्वोत्तम वेतनवाढ झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार अनेक ऑटो कंपन्यांनी कर्मचार्यांसाठी विविध कामगिरी संबंधित उपाययोजना केल्या आहेत. यंदा वेगवेगळ्या आधारावर पगारवाढीसह बोनस देखील देण्यात आला आहे. त्याचवेळी, महिंद्रा अँड महिंद्रा ऑगस्ट 2023 पासून आपल्या कर्मचार्यांच्या पगारात वाढ करण्यास तयार आहे.