Maruti Premium MPV Will Launch: 5 जुलै रोजी लॉन्च होणारी मारुतीची प्रीमियम MPV नेक्सा डीलरशिपद्वारे विकली जाईल. मारुतीचे नेक्सा डीलरशिपद्वारे आपले अनेक मॉडेल विकले जाते. मारुतीची ही एमपीव्ही पूर्णपणे टोयोटा इनोव्हा हायक्रॉस सारखी नसून, त्यामध्ये बाहेरील स्ट्रक्चर मध्ये अनेक बदल करण्यात आले आहे.
Table of contents [Show]
काय असेल नवीन बदल
मारुती एमपीव्हीमध्ये असे काही बदल पाहायला मिळतील, जे इनोव्हा हायक्रॉसपेक्षा अगदी वेगळे दिसेल, जसे की सुधारित ग्रिल मारुती एमपीव्हीमध्ये दिसेल. तसेच, हेडलाइट्स आणि टेललाइट्ससारखे मोठे बदल पाहायला मिळू शकतात. जिथे कंपनी आपला ब्रँड बॅज लावते. सुझुकी ब्रँडचा बॅज तेथे दिसू शकतो. यामध्ये एकूण सात सिट असेल. एकूणच, हे वाहन काहीसे मारुती सुझुकीच्या ग्रँड विटारा आणि टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडरसारखे असेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
डीलरशिपद्वारे विकली जाईल
मारुतीची ही प्रीमियम एमपीव्ही मारुती नेक्सा डीलरशिपद्वारे विकली जाईल, अशी माहिती आहे. नेक्सा डीलरशिपच्या माध्यमातून मारुती देशभरात 5 डोअर जिमनी, बलेनो, इग्निस, XL6, सियाझ, ग्रँड विटारा आणि फ्रँक्स यांसारखे अनेक मॉडेल विकत आहे.
एमपीव्हीमुळे स्पर्धा वाढेल
मारुतीची प्रीमियम एमपीव्ही बाजारात आणण्याची घोषणा झाल्यानंतर, महिंद्रा XUV 700 ला आता टक्कर मिळू शकते, असे मानले जात आहे. महिंद्राची XUV 700 अनेक वैशिष्ट्यांसह बाजारात आहे. सध्या मारुतीच्या या चालीमुळे स्पर्धा वाढताना दिसणार आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये
यामध्ये कार्बन अनुकूल हायब्रीड तंत्रज्ञान असणार आहे. मारुतीच्या या नवीन Premium MPV ची किंमत 20 लाख रुपयांपासून सुरु होऊन 30 लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या गाडीमध्ये अडवॉन्स्ड ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टम (ADAS) सोबत वायरलेस अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कार प्ले सपोर्टचे 10 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, 360 डिग्री कॅमेरा, ऑटोमन फंक्शन सोबत सेकंड रो सीट्स, ड्युअल पॅन पॅनारमिक सनरूफ, मल्टिपल एअरबॅग्स सह अनेक खास फीचर्स पाहायला मिळू शकतात.