Jimny Will soon Launch : अनेक कंपन्यांचे SUV मॉडेल लाँच होत आहेत. ऑफ-रोड कार भारतीय तरुणांच्या पसंतीस पडत आहे. आणि आता नुकतीच मारुती जिमनीची किंमत समोर आली आहे. त्यामुळे जिमनीची वाट बघणाऱ्यांची उत्सुक्ता आता ती विकत घेण्याकडे पोहचली आहे. मारुती सुझुकीच्या जिमनीची किंमत 9.99 लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेलची किंमत 14.99 लाख रुपये आहे.
Table of contents [Show]
कोणाकोणाला देणार टक्कर
मारुती सुझुकीची 5 डोअर SUV जिमनी, महिंद्रा थार 5 डोअर आणि फोर्स गुरखा 5 डोअरशी स्पर्धा करणार आहे. मारुती सुझुकीने आपल्या प्रीमियम वाहन डीलर नेटवर्क Nexa द्वारे जिमनी मॉडेलची बुकिंग सुरू केली होती. कारप्रेमी या ऑफ-रोडर एसयूव्ही जिमनीची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. मारुती सुझुकीच्या जिमनीची किंमत 9.99 लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेलची किंमत 14.99 लाख रुपये आहे.
जिमनीचा इतिहास
मारुतीच्या ऑफ रोडर 5 डोअर जिमनीची रचना, महिंद्राच्या थारशी स्पर्धा करण्यासाठी करण्यात आली आहे. सुझुकीने 53 वर्षांपूर्वी 1970 मध्ये जिमनी लाँच केली होती. आता 2023 मध्ये ते त्याच्या नवीन डिझाइन, लुक आणि स्टाइलसह सादर केल्या जात आहे. मारुतीच्या जिमनीमध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे ब्रेझा आणि एर्टिगाला देखील शक्ती देते. जिमनीच्या पेट्रोल टाकीची क्षमता 40 लिटरच्या जवळपास आहे.
काय आहे मुळ किंमत
मारुती सुझुकीचे Zeta आणि Alpha सारखे प्रकार येत आहेत. काही दिवसांपूर्वी महिंद्राने 10 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत रियर व्हील ड्राईव्ह थार लाँच केले होते, अशा परिस्थितीत जिमनी थेट थारशी स्पर्धा करणार आहे. मुख्य म्हणजे मारुती सुझुकी जिमनीची मूळ किंमत 9.41 लाख रुपये आहे. तर टॉप व्हर्जनची किंमत 13.65 लाख रुपये आली आहे. GST,डीलर कमिशन आणि इतर खर्च जोडल्यानंतर,मारुती सुझुकी जिमनीची किंमत बेस मॉडेलसाठी 9.99 लाख रुपये पासून सुरू होते. तर टॉप मॉडेलची किंमत 14.99 लाख रुपयांपर्यंत आहे.
व्यावसायिकांपुढे आवाहन
मारुती सुझुकी जिमनीमध्ये सुझुकीच्या ALLGRIP PRO (4WD) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मार्केटमध्ये जिमनीची थेट स्पर्धा महिंद्राच्या थारशी आहे. जिमनीमध्ये HD डिस्प्ले आणि वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीसह 22.86 सेमी स्मार्ट प्ले प्रो+ इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. मारुती सुझुकी जिमनी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्स पर्यायांसह येते. ऑफ रोडर जिमनीमुळे ऑफ रोडर आणि SUV व्यावसायिकांपुढे आवाहन उभे राहीले आहेत.