Maruti Suzuki Recalls: मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी आहे. कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की 8 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत विक्री झालेल्या सर्व गाड्या परत मागवण्यात येतील एअरबॅग संबधित तांत्रिक त्रुटी आढळल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. अल्टो k10 , एस-प्रेसो, बलेनो, ईको, ब्रेझा आणि ग्रँड विटारा या मॉडेल्सचे 17,362 युनिट्स परत मागवले आहे.
‘या’ कारणामुळे मारुती सुझुकीने उचलले हे पाऊल
मारुती सुझुकीच्या काही गाड्यांमध्ये एअरबॅग कंट्रोल सिस्टिमशी (Airbag Control System) निगडीत काही त्रुटी आढळल्या आहेत. यामुळे दुर्घटना प्रसंगी चालकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून या मॉडेल्सची फेरतपासणी करण्याचे सुझुकीने ठरवले आहे. यामुळे कंपनीने असे जाहीर केले आहे की वाहनात तांत्रिक सुधारणा होईपर्यंत वाहन चालवू नये.
मारुती सुझुकी या कंपनीवर बऱ्याच काळापासून सुरक्षेबद्दल टीका झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सुझुकीने सुरक्षा विषयक फीचर्समध्ये सुधारणा केली आहे. काही विदेशी कंपन्यांची कार बाजारात एंट्री होताच कमी किमतीत जास्त फीचर्स देण्यास या कंपन्यांनी सुरुवात केली. यामुळे ग्राहक या वाहन कंपन्यांकडे वळले. यामुळे सुझुकीने हे सुरक्षा फीचर्स देण्यास सुरुवात केली. मारुती सुझुकीने यापूर्वी अशी घोषणा केली होती की त्यांनी सर्व मॉडेल्सच्या किमती 1.1% वाढवल्या आहेत.