मारुती सुझुकी ही कार कंपनी नेहमीच मध्यमवर्गीय कुटुंबांच्या बजेटमध्ये कार्स लॉंच करत असते. यासाठी कार बाजारपेठेत या कंपनीची एक वेगळी ओळख आहे. मारुतीचे वाहन कमी किमतीत दीर्घकाळ टिकते म्हणून मध्यमवर्गीय कुटुंब मारुतीला प्राधान्य देतात. मारुतीने वर्ष 2000मध्ये छोट्या कुटुंबांसाठी अल्टोचे मॉडेल विकसित केले. दोन दशकांनंतरही अल्टो 800 ची क्रेझ टिकून आहे.
न्यू मारुती Alto 800ची वैशिष्ट्ये
अल्टो 800 या गाडीची एक्स शोरूम किंमत 3.39 ते 5.41 लाख आहे. या गाडीची आसन क्षमता 5 सीट इतकी आहे. यापूर्वी लॉंच झालेल्या अल्टोपेक्षा या गाडीत अधिक जागा देण्यात आलेली आहे. मारुती अल्टो 800 या कारमध्ये 0.8 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये सीएनजी किटचाही पर्याय देण्यात आला आहे. CNG इंधनासह गाडीचा माइलेज 31 किमी प्रतिकिलो इतका आहे. यात अँन्ड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्ले 7 इंच टचस्क्रीन इन्फॉटेनमेंट सिस्टिम, किलेस एंट्री आणि फ्रंट पॉवर विंडो यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
कर्ज घेऊन खरेदी केल्यास इतका असेल मासिक हप्ता
कार खरेदी करतांना अनेक लोक आर्थिक नियोजन करतात. यात बरेच लोक Emiने कार खरेदी करतात. मारुती अल्टो 800 या गाडीचे बेस व्हेरिएंट खरेदी करत असाल तर त्याची 3.71 लाख इतकी आहे. ही कार खरेदी करतांना Emi हा पर्याय उपलब्ध आहे. जर तुम्ही 80000 रुपयांचे डाउन पेमेंट भरले आणि 5 वर्षांसाठी कर्ज घेतले. तर 9.8 टक्के इतक्या व्याजदराने तुम्हाला मात्र 6,200 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल.