Maruti Jimny Price 12.74 Rs : मारुती सुझुकी कंपनीने जानेवारी 2023 च्या ऑटो एक्सपोमध्ये जिमनीचे अनावरण केले होते. तेव्हापासून ग्राहक या एसयूव्ही गाडीची लाँच होण्याची वाट पाहत होते. मारुती सुझुकी कंपनीने भारतीय बाजारात जिमनी लाँच केली आहे, या गाडीची एक्स-शोरुम किंमत 12 लाख 74 हजार रुपये आहे. या गाडीचे बुकिंग सुरु झाले आहे. एसयूव्ही जिमनी ही महिंद्रा थारची स्पर्धक मानली जाते.
जिमनीची डिलिव्हरी सुरु
काही महिन्यांआधीच मारुती जिमनीचे बुकिंग सुरु झाले आहे. त्यामुळे या गाडीची डिलिव्हरी कंपनीने आजपासूनच सुरु केली आहे. मारुती जिमनीमध्ये (5-दार) झेटा आणि अल्फा व्हेरियंटमध्ये स्वयंचलित आणि मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध आहे. मारुती जिमनी 6 व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे. मारुती जिमनीचा समावेश लष्कराकडून आपल्या ताफ्यात केला जाण्याची शक्यता आहे. परंतु, जिमनी लष्कराला देतांना त्यात काही वैशिष्ट्यपूर्ण बदल केले जाऊ शकतात.
जीमनीच्या व्हेरियंटची किंमत
मारुती जिमनी झेटा एमटीची किंमत (Maruti Jimny Zeta MT Price) 12 लाख 74 हजार रुपये आहे.
मारुती जिमनी झेटा एटीची किंमत (Maruti Jimny Zeta AT Price) 13 लाख 94 हजार रुपये आहे.
मारुती जिमनी अल्फा एमटीची किंमत (Maruti Jimny Alpha MT Price) 13 लाख 69 हजार रुपये आहे.
मारुती जिमनी अल्फा एमटी ड्युअल-टोनची किंमत (Maruti Jimny Alpha MT dual-tone Price) 13 लाख 85 हजार रुपये आहे.
मारुती जिमनी अल्फा एटीची किंमत (Maruti Jimny Alpha AT Price) 14 लाख 89 हजार रुपये आहे.
मारुती जिमनी अल्फा एटी ड्युअल टोन किंमत (Maruti Jimny Alpha AT dual-tone Price) 15 लाख 05 हजार रुपये आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये
मारुती जिमनी मध्ये 1.5 लिटर के-सिरीज इंजिन उपलब्ध आहे. यामध्ये ग्राहकाला निष्क्रिय स्टार्ट-स्टॉप बटण मिळेल. जिमनी ही SUV 6000 rpm वर 77.1kW ची कमाल पॉवर देते. तसेच 4000 rpm वर 134.2 Nm चा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. Maruti Jimny SUV चा ग्राउंड क्लीयरन्स 210 mm आहे. Maruti Jimny SUV चा 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरियंट 16.94 किलोमीटर प्रति लीटर पर्यंत आहे. तर 4-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरियंट 16.39 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे.
5 डोअरच्या मारुती Jimny SUV मध्ये 36 अंशांचा अप्रोच एंगल, 50 डिग्रीचा डिपार्चर एंगल आणि 24 डिग्रीचा रॅम्प ओव्हर अँगल आहे. यासह एलईडी हेडलॅम्प, 9-इंच टचस्क्रीन सिस्टम, क्रूझ कंट्रोल, मागील पार्किंग कॅमेरा आणि सहा एअरबॅग्ज आहेत. याचे ग्राउंड क्लीयरन्स 210mm आहे आणि ते खूपच हलके आहे. तसेच जिमनीमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 1.5-लीटर पेट्रोल इंजिन (105PS) आहे. तसेच त्यात तीन 2H, 4H आणि 4L अशा तीन ड्राइव्ह मोड आहेत.