मारुती सुझुकीने ग्रँड वितारा Grand Vitara या गाडीचे सीएनजी मॉडेल बाजारात लाँच केले आहे. याआधी कंपनीने पेट्रोल आणि हायब्रीड ही दोन मॉडेल्सही लाँच केली आहेत. गँड वितारा या सीएनजी SUV ची किंमत 12 लाख 85 हजार रुपयांपासून पुढे आहे. या गाडीची डेल्टा आणि झेटा ही दोन व्हेरियंट उपलब्ध आहेत.
काय आहेत फिचर्स (Features of Grand Vitara)
ग्रँड वितारा गाडीसाठी K सिरिजमधील दीड लिटर क्षमतेचे इंजिन वापरण्यात आले असून यातून 86bhp and 121 Nm टार्क तयार होतो. हेच इंजिन मारुतीच्या पेट्रोल गाडीसाठी वापरण्यात आले आहे मात्र, यातन 100bhp and 136 टार्क निर्मिती होते. सीएनजी मॉडेलमध्ये फाइव्ह स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स असून या गाडीला 26.6 किमी प्रति लिटर एवढे मायलेज आहे.
मारुती सुझुकी विताराच्या पेट्रोल मॉडेल्समध्ये जे फिसर्च आहेत तीच फिचर्स सीएनजी मॉडेललाही देण्यात आली आहेत. गाडीला सहा एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. सोबत स्मार्टप्ले प्रो+ इन्फोटेंनमेंट सिस्टिम, वायरलेस अॅपल कारप्ले, अँड्रॉइड अॅटो, बिल्ट इन सुझुकी कनेक्ट ही फिचर्स देण्यात आली आहेत.
सध्या मारुती सुझुकी वितारा सीएनची या गाडीची स्पर्धा टोयोटा हायरायडर सीएनजी या गाडीशी असून लवकरच ही गाडी लाँच होणार आहे. टोयोटाने या गाडीसाठी बुकिंगही सुरू केले आहे. बलेनो, ब्रेझा, स्विफ्ट, वॅगनागर, एस क्रॉस, एर्टिगा यांच्यासह मारुती सुझुकीचे विविध मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत.