Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

मारूती सुझुकी SUV प्रकारात 50 टक्के वाटा मिळवण्यासाठी प्रयत्नशील

share market maruti suzuki

मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India) कंपनी देशांतर्गत वाहन बाजारपेठेतील 50 टक्के वाटा पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी एसयुव्ही (Sport utility vehicle-SUV) प्रकारातील गाड्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे.

मारूती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India) कंपनी देशांतर्गत वाहन बाजारपेठेतील 50 टक्के वाटा पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी एसयुव्ही (Sport utility vehicle-SUV) प्रकारातील गाड्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे.

मारूती सुझुकी (Maruti Suzuki) ही देशात मोठ्या प्रमाणात कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. पण या कंपनीचा 2022 या वर्षातील बाजारातील हिस्सा 43.38 टक्क्यांपर्यंत घसरला आहे; 2021 मध्ये तो 47.7 टक्के होता. हा घसरलेला टक्का पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी आणि बाजारातील एकूण 50 टक्के वाटा मिळवण्यासाठी मारूती सुझुकी (Maruti Suzuki)ने गाड्यांची इंधन कार्यक्षमता वाढवण्यासाठी हायब्रीड पॉवरट्रेनसारख्या नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करून एकापेक्षा अधिक एसयुव्ही (SUV) गाड्या मार्केटमध्ये आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

सध्या कोरियन कंपनीकडून अशाप्रकारच्या गाड्या बाजारात आणल्या गेल्या आहेत. मारूती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनीचा या मॉडेल्सपेक्षा अधिक चांगल्या आणि विशेष करून डिझेल इंजिनला पर्याय देणाऱ्या गाड्या बाजारात आणण्याचा मानस आहे. कंपनी सध्या सीएनजी (CNG) आणि इतर हायब्रीड पर्यायांचा विचार करत आहे. 

मारूती सुझुकीचा (Maruti Suzuki) 2018-19 मध्ये बाजारातील हिस्सा 51.22 टक्के आणि 2019-20 मध्ये 51.03 टक्के होता. मे, 2022 मध्ये कंपनीने 1,61,000 युनिट्स विक्रीद्वारे एकूण विक्रीत 7 टक्क्यांची वाढ नोंदवली होती. तर देशात 1,42,000 युनीट्सची विक्री करून 1.5 टक्के विक्रीची नोंद केली होती आणि 27,200 गाड्यांची निर्यात करून 49 टक्के वाढ नोंदवली होती. पण तरीही कंपनीच्या एकूण विक्रीत किंचित घट झाल्याचेच दिसून येते. ही घट भरून काढण्यासाठी कंपनीने योजना आखली असून बाजारातील 50 टक्के हिस्सा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद

मारुती सुझुकीचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव (Shashank Srivastava, Executive Director of Maruti Suzuki) यांच्या मते, गेल्या 4-5 महिन्यांतील ग्राहकांच्या मागणीचा पॅटर्न बऱ्यापैकी स्थिर आहे. चौकशी आणि बुकिंगला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मागणी होत आहे, त्याप्रमाणात पुरवठा करण्यात काही अडचणी येत असल्याचे श्रीवास्तव यांनी मान्य करत कंपनीकडे अजून 2,95,000 बुकिंग प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.

सेमी कंडक्टरचा मर्यादित पुरवठा

मार्केटमध्ये सेमीकंडक्टरचा मर्यादित पुरवठा होत असल्याने बुकिंगची मागणी पूर्ण करता येत नसल्याचे कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पण येत्या काळात कंपनीच्या उत्पादनात वाढ होईल आणि देशांतर्गत विक्रीच्या युनिट्सची संख्या झपाट्याने वाढ होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांना आहे.

ऑटो-मोबाईल क्षेत्रात चढउतार

कंपनीच्या शेअरला मार्केटमधील चढ-उतारांचा सामना करावा लागत आहे. सध्या बाजाराला ऊर्जा, आयटी, पीएसयू, तेल आणि गॅस या क्षेत्रातील कंपन्यांकडून साथ मिळत असल्याचे दिसून येते. निफ्टी (NIFTY) 16,550 अंकाच्या आसपास आहे. तर सेन्सेक्समध्ये अपेक्षित वाढ होताना दिसत नाही. 100 अंकांची वाढ झाली आहे आणि बाजाराला ऊर्जा, आयटी, पीएसयू, तेल आणि वायू क्षेत्रांकडून अधिक पाठिंबा मिळत आहे.

मारूती सुझुकी कंपनीने सध्या एसयुव्ही (SUV) प्रकारात देशांतर्गत बाजारातील 50 टक्के मार्केट शेअर मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. यादृष्टिने कंपनी दरवर्षी एसयुव्ही सेगमेंटमध्ये नवनवीन वाहने लॉन्च करण्याची योजना आखत आहे.

image source - https://bit.ly/3MehW58