खडतर, डोंगराळ, दुरवरच्या प्रवासात, टफ अशी ऑफ रोड चालणारी मारुती जिप्सी देखील लष्कराचे एक वैशिष्ट्य ठरली आहे. मारुती कंपनीने दोन दशकांत भारतीय लष्कराला जिप्सीच्या 35,000 हून अधिक युनिट्स विकल्या आहेत. आता लष्कर मारुती जिमनी देखील आपल्या ताफ्यासाठी घेऊ शकते. भारतीय लष्कराने जिमनीमध्ये इंटरेस्ट दाखविला आहे. त्यामुळे कंपनी सध्या आर्मी-स्पेक जिमनीसाठी आवश्यक असलेल्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करीत आहे, अशी माहिती मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी दिली.
लष्करासाठी केले जाणार काही बदल
मारुती जिमनी सैन्यासाठी सज्ज व्हावी, यासाठी त्यात काही बदल केले जातील. सहसा सैन्याच्या बऱ्याच वाहनांमध्ये सॉफ्ट टॉप असतो. त्यामुळे जेव्हा जिमनी सैन्यासाठी तयार केली जाईल, तेव्हा त्याला सॉफ्ट टॉप दिला जाऊ शकतो. सोबतच सस्पेंशन आणि पॉवरट्रेन देखील विशेषत: ट्यून केले जातात.
जिमनी घेणार जिप्सीची जागा
मारुती कंपनीने दोन दशकांत भारतीय लष्कराला जिप्सीच्या 35,000 हून अधिक युनिट्स विकल्या आहेत. हे युनिट्स सॉफ्ट टॉप, फुल ओपन आणि अगदी हार्ड टॉपसह विकले गेले. 2020 पर्यंत ऑलिव्ह ग्रीन कलरची जिप्सी लष्कराला देण्यात आली होती. आता जिमनी सैन्यात जिप्सीची जागा घेऊ शकते.
जिमनीची वैशिष्ट्ये
5 डोअरच्या मारुती Jimny SUV मध्ये 36 अंशांचा अप्रोच एंगल, 50 डिग्रीचा डिपार्चर एंगल आणि 24 डिग्रीचा रॅम्प ओव्हर अँगल आहे. यासह एलईडी हेडलॅम्प, 9-इंच टचस्क्रीन सिस्टम, क्रूझ कंट्रोल, मागील पार्किंग कॅमेरा आणि सहा एअरबॅग्ज आहेत. याचे ग्राउंड क्लीयरन्स 210mm आहे आणि ते खूपच हलके आहे. तसेच जिमनीमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 1.5-लीटर पेट्रोल इंजिन (105PS) आहे. तसेच त्यात तीन 2H, 4H आणि 4L अशा तीन ड्राइव्ह मोड आहेत.