मारुतीच्या कारची (Maruti car) मध्यमवर्गीयांमध्ये मोठी क्रेझ आहे. प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबापासून ते उच्चवर्गीय कुटुंबापर्यंतदेखील मारुतीची वाहनं पसंत केली जातात. मारुती सुझुकी अल्टो 800 हे वाहन असं वाहन आहे जे अनेक वर्षांपासून लोकांच्या हृदयात राज्य करत आहे. मारुती अल्टो 800ची लोकप्रियता पाहून मारुतीनं आता याला नव्या अवतारात सादर करण्याची घोषणा केली आहे. आता यामध्ये पूर्णपणे नवा अवतार पाहायला मिळणार आहे. अपडेटेड इंजिनसह (Engine) अपडेटेड फीचर्स असणार आहेत. टाइम्सबुलनं याचा आढावा घेतला आहे.
मारुती अल्टो 800चे फीचर्स
मारुती अल्टो 800मध्ये तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त आणि मोठी केबिन स्पेस दिली जात आहे. सर्व डिजिटल आणि स्मार्ट फीचर्स यात मिळतात. तुम्हाला 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, साउंड सिस्टीम, कीलेस एंट्री, ड्रायव्हर साइड एअरबॅग, सीट बेल्ट अलर्ट, रिअर पार्किंग सेन्सर्स, ईबीडीसह एबीएस, चाइल्ड लॉक, लो फ्युएल इंडिकेटर, कॅमेरा व्ह्यू आणि पार्किंग सेन्सर ही वैशिष्ट्ये दिली जात आहेत.
मजबूत इंजिन
कंपनीनं यावेळेस या नवीन अल्टोमध्ये 796 सीसीचं बीएस 6 (BS6) इंजिन दिलं आहे. तुम्हाला हे इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेलं आढळेल. मायलेजबद्दल बोलायचं झाल्यास याच्या आत तुम्हाला पेट्रोलमध्ये वेगळं आणि सीएनजीमध्ये वेगळं मायलेज मिळणार आहे. यामध्ये पेट्रोलवर तुम्हाला 22.05 किमी/लिटर मायलेज मिळणार आहे. तर सीएनजीवर 31.59 किमी/किलो मायलेज मिळणार आहे.
किंमत काय?
मारुती अल्टो 800 या कारची सुरुवातीची शोरूम किंमत 3.39 लाखांपासून सुरू होणार आहे, तर नवीन अल्टो 800ची किंमत पूर्वीपेक्षा 28,000 रुपये जास्त असणार आहे. किंमत परवडण्याजोगी असल्यानं अनेकांच्या बजेटमध्ये बसणारी अशी ही कार आहे. पूर्वीप्रमाणेच आता या नव्या अवतारातल्या अल्टोला किती प्रतिसाद मिळतो, ते पाहणं महत्त्वाचं आहे.