वित्त सचिव टी व्ही सोमनाथन वित्त मंत्रालयातील सर्वात वरिष्ठ नोकरशहा आहेत. अदानी समूहाच्या शेअर्सच्या घसरणीमुळे शेअर बाजारात झालेली उलथापालथ ही मॅक्रो इकॉनॉमिकच्या दृष्टिकोनातून केवळ एक छोटीशी गोष्ट आहे. तीचा मोठा विषय केला गेलाय, अशा आशयाचे विधान त्यांनी केले आहे. त्यांनी शुक्रवारी याविषयी सांगितले की, भारताची सार्वजनिक आर्थिक व्यवस्था ही मजबूत आहे. ते असेही म्हणाले की, शेअर बाजारातील अस्थिरता ही सरकारचा चिंतेचा विषय नाही आणि यावर आवश्यक ती कारवाई करण्यासाठी स्वतंत्र नियामक आहेत.
बँका आणि विमा कंपन्यांनी समूहातील गुंतवणूक पाहता अदानी समूहावरील फसवणुकीच्या आरोपांचा आर्थिक व्यवस्थेवर काय परिणाम होतो या प्रश्नाला उत्तर देताना सोमनाथन म्हणाले की, भारतातील सार्वजनिक वित्तीय संस्था मजबूत आहेत.त्यांच्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, 'आर्थिक स्थिरतेच्या दृष्टिकोनातून, ठेवीदार किंवा पॉलिसीधारक किंवा या संस्थांमध्ये समभाग धारण करणार्या कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. कोणत्याही एका कंपनीचे होल्डिंग असे नाही की त्याचा मॅक्रो स्तरावर कोणताही परिणाम होईल. या दृष्टिकोनातून काळजी करण्यासारखे काहीही नाही.
अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरची किंमत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 4,190 रुपयांच्या उच्चांकावरून जवळपास 70 टक्क्यांनी घसरली आहे. अदानी समूहाच्या समभागांच्या घसरणीमुळे जानेवारी महिन्यापासून सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला आहे. या उलथापालथीचा सुधारित निर्गुंतवणूक संकलनावर परिणाम होईल का, असे विचारले असता, सोमनाथन म्हणाले की या उलथापालथींचा मॅक्रो अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही.
व्यापक आर्थिक दृष्टीकोनातून हा मुद्दा नाही
हा व्यापक आर्थिक दृष्टिकोनातून मुद्दा नाही. हे चहाच्या कपातील वादळासारखे आहे. त्याचा एकूण बाजाराशी काहीही संबंध नाही. वित्त सचिव पुढे म्हणाले की, शेअर बाजारातील किमतीतील अस्थिरता ही चिंतेची बाब नाही आणि ही सर्व परिस्थितींमध्ये सर्व शेअर बाजारांची सार्वत्रिक अशी घटना आहे.ते आणखी अस म्हणाले, “सरकारचे काम गुंतवणूकीसाठी योग्य वातावरण निर्माण करणे आणि वित्तीय बाजाराचे चांगले नियमन करणे आहे. बाजारपेठेत पारदर्शकता आहे आणि ते चांगले चालेल याची आम्हाला खात्री करावी लागेल. अर्थसचिव सोमनाथन यांनीही सांगितले की, बाजारातील विषमता कमी व्हावी आणि सरकारची स्वत:ची स्थूल आर्थिक धोरणे भक्कम राहिली पाहिजेत, हे पहावे लागेल.