Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Scam: शारदा चिट फंड स्कॅम!

Sharda Chit Fund Scam

Market Scam: भारतातील सर्वात जास्त लोक ग्रामीण भागात राहतात आणि त्यांचे दोन सर्वांत महत्त्वाचे प्रश्न म्हणजे पैसे कुठे डिपॉझिट करायचे आणि लोन कुठून घ्यायचे. सुदिप्तो सेन यांनी याचाच फायदा घेत लोकांच्या पहिल्या प्रश्नावर उत्तर म्हणून शारदा चिट फंड सुरु केला होता.

इन्व्हेस्टमेंट करणं आणि त्यावर चांगले रिटर्न्स मिळवणे ही काळाची गरज बनली आहे. आज प्रत्येकाला पैसे बँकेत न ठेवता कुठेतरी गुंतवून त्यावर रिटर्न्स मिळवायचे आहेत; ही उत्तम गोष्ट आहे. यासाठी बरेच जण इक्विटी म्युच्युअल फंडस् (Mutual Funds) किंवा इतर ॲसेट्समध्ये पैसे गुंतवून चांगले रिटर्न्स मिळवत आहेत. तेच दुसरीकडे असे काही गुंतवणूकदार आहेत; ज्यांना कमी वेळेत श्रीमंत व्हायचंय. सय्यम नसलेल्या अशा इन्वेस्टर्सचा फायदा स्कीम्स विकणारे स्कॅमर्स उचलतात. भारतात अशा अनेक स्कीम्स येऊन गेल्या ज्यांनी सहा महिन्यात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवून सामान्य लोकांचे पैसे घेऊन फरार झाले आहेत. अशा कितीतरी घटना घडल्या आहेत; ज्यामध्ये लाखो करोडोंचे घोटाळे झाले आहेत. असाच एक स्कॅम 2013 मध्ये झाला होता. ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. 2013 मधील शारदा चिट फंड स्कॅमने भारतातील सय्यम नसणाऱ्या अनेक लोकांचे डोळे उघडले. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे शारदा चिट फंड स्कॅम (Sharda Chit Fund Scam).

शारदा चिट फंड स्कॅमची सुरुवात!

कोणत्याही पॉन्झी स्कीम्समध्ये लोक पैसे टाकण्यासाठी तयार होतातच कसे? जेव्हा प्रश्न लोकांच्या भावनांचा असतो तेव्हा कोणतही काम करवून घेणे सोपे होऊन जाते. मग ते पैसे गोळा करणे असो किंवा डोळे बंद करून विश्वास ठेवणे असो. याचाच फायदा सुदिप्तो सेन (Sudipto Sen) यांनी उचलला. भारतातील सर्वात जास्त लोक ग्रामीण भागात राहतात आणि त्यांचे दोन सर्वांत महत्त्वाचे प्रश्न म्हणजे पैसे कुठे डिपॉझिट करायचे आणि लोन कुठून घ्यायचे. सुदिप्तो सेन यांनी याचाच फायदा घेत लोकांच्या पहिल्या प्रश्नावर उत्तर म्हणून एक चिट फंड सुरु केला. सरकार देखील लोकांचा हाच प्रश्न सोडविण्यासाठी अनेक सेव्हिंग फंडस् सुरु करत होते. पण या खाजगी फंडसोबत स्पर्धा करणे सरकारलाही अवघड होते. सेन यांच्या या फंडात खास असे काहीच नव्हते. तरीही लोक त्यावर विश्वास ठेवत होते. कारण सेन यांच्या फंडाला धार्मिक बाजू होती. त्यांच्या पत्नी शारदा देवी या बंगालमधील सर्वात प्रसिद्ध अशा पंथाशी संबंधित होत्या. याचाच फायदा घेत सुदिप्तो सेन यांनी शारदा चिट फंड सुरु केला.

ग्रामीण भाग टार्गेट

सुदिप्तो सेन यांनी ग्रामीण भागात अनेक एजन्ट्स तयार केले. जे या फंडची माहिती लोकांना देत होते. त्याबदल्यात या एजन्ट्सना डिपॉझिटवर 25 ते 40 टक्क्यापर्यंत कमिशन मिळत होते. त्यासोबतच त्यांना आकर्षक भेटवस्तू दिल्या जात होत्या. या आकर्षणामुळे खूप कमी कालावधीत शारदा चिट फंडची जादू संपूर्ण बंगालवर पडली. बंगाल सोबतच शारदा ग्रुप ओडिशा, आसाम, त्रिपुरा, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये देखील पोचला.


काय होती शारदा स्कीममधील मेख!

शारदा स्कीम देखील एका पॉन्झी स्कीम प्रमाणेच होती. ज्यामध्ये गुंतवणूकदारांना चांगले किंवा काही वेळेस डबल रिटर्न्स मिळवून देतो असे सांगून पैसे घेतले होते. आणि तेच पैसे दुसऱ्या गुंतवणूकदाराला रिटर्न्स स्वरूपात दिले जात होते. जोपर्यंत गुंतवणूकादार येणे बंद होत नाही. तोवर ही साखळी चालू राहते. शारदा स्कीममधील गुंतवणूकदारांना याची काहीच कल्पना नव्हती. त्यांना फक्त भरपूर रिटर्न्सचे आमिष दाखवले जात होते. शारदा स्कीमची ही साखळी कायम सुरू राहण्यासाठी सुदिप्तो सेन यांना गुंतवणूकदार आणणे गरजेचे होते. ज्यासाठी ते मोठमोठ्या सेलिब्रिटीज आणि नेत्यांची मदत घेत होते. एमपी सातभाई रॉय व मिथुन चक्रवर्ती हे या स्कीमचे ब्रँड अम्बेसिडर्स होते.

सेबी विरुद्ध शारदा चिट फंड

शारदा स्कीम हा सुरुवातीपासूनच एक चिट फंड असूनदेखील डिबेंचर्स आणि बॉण्ड्स इशू करू लागला होता. त्याचवेळी SEBIची  नजर शारदा वर पडली. SEBI च्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी SEBI ने 2009 मध्ये शारदा फंड विरोधात पुरावे शोधण्यास सुरुवात केली. त्याचवेळी शारदा फंडने SEBIकडून आपला पिच्छा सोडवण्यासाठी 239 कंपन्या तयार केल्या. ज्यांचा गुंता सोडविण्यासाठी SEBI ला एक वर्ष लागले. एका वर्षानंतर जेव्हा SEBI पुन्हा शारदाच्या मागे लागली तेव्हा पुन्हा शारदाने आपला दुसरा डाव खेळाला व स्वतःला एक इन्व्हेस्टमेंट स्कीम म्हणून घोषित केले. असे शारदाच्या अनेक प्रयत्नांमुळे SEBI च्या हातून शारदा निसटत होती. पण हे फार काळ टिकले नाही. 

2011 मध्ये SEBI ने राज्य सरकारला शारदाच्या या चुकीच्या उपक्रमांची माहिती दिली. पण राजकीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे शारदाने पुन्हा SEBIवर मात केली. SEBI च्या हातातून भरपूर वेळा सुटून देखील SEBI ने चौकशीमध्ये माघार घेतली नाही व शेवटी मार्च २०१३ मध्ये त्यांची मेहनत सफल झाली. सचिन पायलट यांनी शारदा स्कीमचा प्रश्न लोक सभेत मांडला. त्यानंतर एप्रिलमध्ये सेन यांनी 18 पानांचे कबुलीपत्र CBI ला लिहिले. ज्यामध्ये त्यांनी शारदा स्कीमने केलेल्या घोटाळ्यांची कबुली दिली. यामध्ये अनेक नेत्यांची नावे होती. एप्रिल 2014 पर्यंत CBI ने शारदा ग्रुप विरोधात 385 प्रकरणांमध्ये FIR फाईल केले होते.