Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Closing Bell: शेअर मार्केट तेजीसह बंद! सेन्सेक्स 242 अंकांनी वधारला; ONGC, अदानी पॉवरचा भाव वाढला

Market Closing Bell

आज (मंगळवार) दिवसभर भारतीय शेअर बाजारातील वातावरण सकारात्मक राहिले. दोन्ही प्रमुख निर्देशांक दिवसभर हिरव्या रंगात ट्रेड करत होते. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 242 अंकांच्या वाढीसह 61339 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 77 अंकांनी वाढून 18142 अंकांवर बंद झाला.

Market Closing Bell: आज (मंगळवार) दिवसभर भारतीय शेअर बाजारातील वातावरण सकारात्मक राहिले. दोन्ही प्रमुख निर्देशांक दिवसभर हिरव्या रंगात होते. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 242 अंकांच्या वाढीसह 61339 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 77 अंकांनी वाढून 18142 अंकांवर बंद झाला. मागील सलग आठ दिवसांपासून भांडवली बाजार प्रगती करत आहे. बड्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिमाही निकालाच्या आकडेवारीमुळेही बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळाली.

कॉर्पोरेट कंपन्यांच्या निकालामुळे सकारात्मक वातावरण

आज दिवसभर 13 क्षेत्रीय निर्देशांकही तेजीत होते. कॉर्पोरेट कंपन्यांचे तिमाही निकाल सकारात्मक आल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण होते. बुधवारी अमेरिकन फेडरल बँक व्याजदराबाबत महत्त्वाचा निर्णय देईल. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर व्याजदर वाढ झाली तर पुन्हा बाजार खाली कोसळू शकतो. एकूण एप्रिल महिन्याचा विचार करता बेंचमार्क निफ्टी इंडेक्स 4 टक्क्यांनी वाढला. नोव्हेंबर 2022 नंतर एप्रिल महिना भांडवली बाजारासाठी सर्वाधिक चांगला ठरला. सोन्याचे भाव प्रति ग्रॅम 225 रुपयांनी खाली आले.  

टॉप लूझर्स आणि गेनर्स कोण?

Ircon International Ltd, वेलस्पून इंडिया प्रायवेट लिमिटेड, रेल विकास निगम लिमिटेड, KEC International Ltd, Rites Ltd, एनटीपीसी या कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर मँगलोर रिफायनरी पेट्रोकेमिकल्स, आरबीएल बँक, त्रिवेणी टर्बाइन, गुडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड या कंपन्यांचे शेअर्स खाली आले. 

market.jpg

सौजन्य गुगल

परदेशी गुंतवणूक वाढली

एप्रिल महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवली बाजारावर विश्वास ठेवला. या काळात परदेशी संस्थात्मक गुंतवणूक (FII) 3 हजार 300 कोटींनी वाढली. भारतीय बाजार सकारात्मक असला तरी युरोपमध्ये महागाई पुन्हा डोके वर काढत आहे. नागरिकांची खरेदी क्षमता देखील कमी झाली आहे. त्यामुळे प्रमुख बँका व्याजदर वाढ करू शकतात. युरोपातील 20 देशांचा उपभोग्य खर्च 7 टक्क्यांनी वाढला आहे.

तिमाही निकालाची आकडेवारी

अदानी टोटल गॅस कंपनीचे तिमाही निकाल आज जाहीर झाले. कंपनीचा नफा मागील वर्षाच्या तुलनेत 21 टक्क्यांनी वाढून 98 कोटी रुपये झाला. एकूण महसूलातही 12% वाढ झाली. अंबुजा सिमेंट कंपनीचा नफा मागील वर्षीच्या तुलनेत फक्त 2 टक्क्यांनी वाढला. पेप्सीको कंपनीची सर्वात मोठी फ्रँचाइजी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी वरुण बेवेरेजेस कंपनीचा नफा मागील वर्षाच्या तुलनेत 69% टक्के वाढून 429 कोटी रुपये झाला.