1892 मध्ये एक 14 वर्षाचा मुलगा 5 डॉलर प्रति आठवडे पगारावर एका स्टॉक ब्रोकरेज फर्ममध्ये कामाला लागतो आणि वयाच्या 15 व्या वर्षी शिकागो, बर्लिंग्टन आणि क्विन्सी रेलरोड या शेअर्समध्ये 5 डॉलर्सची बेट लावून तो 3.12 डॉलर्सचा फायदादेखील मिळवतो. ऐकताना साधी वाटणारी ही गोष्ट वाटते तितकी साधी मुळीच नाही. ही गोष्ट आहे जगातल्या सर्वात श्रेष्ठ ट्रेडर जेस्सी लिव्हरमोर (Jesse Livemore) यांची. शेअर मार्केटच्या इतिहासातील जेस्सी यांचे हे पान बऱ्याच जणांना ठाऊक नाही. त्यांचे मार्केटमधील करिअरच नव्हे तर त्यांनी मार्केटला अनेक स्ट्रॅटेजीच्या स्वरूपात दिलेले योगदानदेखील मौल्यवान आहे. 5 डॉलरपासून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नावाजलेले जेस्सी लिव्हरमोर, आज आपण मार्केट बुलमध्ये (Market Bull) त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.
जेस्सी लिव्हरमोर यांचे सुरुवातीचे आयुष्य
लिव्हरमोर यांचा जन्म श्रुसबरी, मॅसॅच्युसेट्स येथील एका गरीब परिवारात झाला होता. लिव्हरमोर खूपचच कमी वयात लिहायला आणि वाचायला शिकले होते. पण त्यांच्या वडिलांनी त्यांना खूप लहान वयात त्यांना शेतात मदत करण्यासाठी सांगितले होते. तसेच त्यांची शाळाही बंद केली होती. यामुळे लिव्हरमोर हे त्यांच्या आईच्या मदतीने घर सोडून पळून गेले होते. घर सोडल्यानंतर त्यांना अनेक वेगवेगळ्या संकटांचा समाना करावा लागला होता.
जेस्सी लिव्हरमोर यांची शेअर मार्केटमध्ये एंट्री
लिव्हरमोर यांनी 1891 मध्ये, वयाच्या 14 व्या वर्षी, पेन वेबर स्टॉक ब्रोकरेजमध्ये दर आठवड्याला 5 डॉलर या पगारावर नोकरी सुरू केली होती. एका वर्षाभरातच त्यांनी 1892 मध्ये त्यांनी शिकागो, बर्लिंग्टन आणि क्विन्सी रेल्वेरोड या शेअर्सवर 5 डॉलर्सची बेट लावून त्यातून 3.12 डॉलर्सचा फायदा मिळवला होता. वयाच्या 16-17 वर्षापर्यंत मार्केटमध्ये लिव्हरमोर दर आठवड्याला 200 डॉलर्स कमवत होते व लोक त्यांना द बॉय प्लंगर नावाने ओळखू लागले होते. लिव्हरमोर स्टॉक्स विकत न घेता त्या स्टॉक्सच्या किमतींवर बेट लावत. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी नोकरी सोडून ट्रेडिंग करण्याचा निर्णय घेतला.
जेस्सी लिव्हरमोर यांनी 19 व्या वर्षी त्यांनी ट्रेडिंग मधून जवळ जवळ 10 हजार डॉलर्स कमावत फक्त 3 वर्षांत 1 हजार टक्के रिटर्न मिळवला होता. लिव्हरमोर सतत बेट जिंकत असल्याने बोस्टनमधील बकेट शॉप जिथे ही बेट लावली जात त्यावर बंदी घालू लागले. त्यामुळे त्यांना सप्टेंबर 1900 मध्ये न्यूयॉर्कमध्ये यावे लागले. न्यूयॉर्क मध्येही लिव्हरमोर यांचे नाणे खणखणीत वाजत होते. त्यांनी फक्त 3 दिवसात 10 हजार डॉलर्सचे 50 हजार डॉलर केले. त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी फायद्याबरोबर नुकसान देखील सहन केले आहे. यामध्ये 1901 मध्ये त्यांचा एक ट्रेड फसला व त्यांनी लावलेले सगळे पैसे ते त्यात गमावून बसले. अशा घटनांनी खचून न जाता त्यांनी पुन्हा उभे राहत पुढे मोठा फायदा मिळवला.
लिव्हरमोर यांचे ट्रेडिंगचे नियम काय होते?
लिव्हरमोर यांचे ट्रेडिंगचे नियम जुने जरी असले तरी गुंतवणूकदार आज देखील त्यांना फॉलो करतात. जेस्सी यांच्या मते मार्केटमध्ये नवीन काही असू शकत नाही, कारण मार्केट डोंगराएवढे जुने आहे. आज शेअर मार्केटमध्ये जे काही घडते ते याआधीही घडले आहे आणि यापुढेही होईल.” त्यामुळे त्यांच्या ट्रेडिंगचे नियम समजून घेऊन त्याचा अवलंब कोणीही करू शकतो.
- ट्रेंडसह ट्रेडिंग करा. बुल्स मार्केटमध्ये स्टॉक्स खरेदी करा आणि बेअर मार्केटमध्ये शेअर्स शॉर्ट करा.
- तुम्हाला स्वत:ला ट्रेडिंगबद्दल खात्री नसेल तर ट्रेडिंग करू नका.
- ट्रेडिंग करताना परिपूर्ण स्त्रोतांचा वापर करा.
- शेअर मार्केटमध्ये इंट्री घेण्यापूर्वी मार्केटचा अंदाज घ्या. प्रतीक्षा करा.
- ट्रेडिंग करताना नेहमी संयम बाळगा, संयमाने पैसा आणि वेळ दोन्हीची बचत होते.
- ज्या ट्रेडमधून नुकसान होत आहे, असे ट्रेड लगेच बंद करा.
- ट्रेड करण्याआधी थांबायचे कधी आणि कुठे हे निश्चित करा आणि मगच ट्रेडिंग करा.
- प्रॉफिटची शक्यता कमी असल्यास ट्रेडमधून लगेच बाहेर पडा.