Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google च्या स्पर्धा विरोधी कृत्यामुळे ग्राहकांसह अर्थव्यवस्थेचे नुकसान, जाणून घ्या कुणी केलाय असा आरोप

Google

Google च्या स्पर्धा विरोधी कृत्यामुळे ग्राहकांसह अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे. असा आरोप मॅप माय इंडिया (MapMyIndia) या देशांतर्गत कंपनीने गुगलवर आरोप केला आहे.

Google च्या स्पर्धा विरोधी कृत्यामुळे ग्राहकांसह अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे. असा आरोप मॅप माय इंडिया (MapMyIndia) या देशांतर्गत कंपनीने गुगलवर आरोप केला आहे. 

मॅप माय इंडियाचे सीईओ रोहन वर्मा म्हणतात की, गुगलच्या स्पर्धाविरोधी कारवायांमुळे भारताची अर्थव्यवस्था आणि भारतीय ग्राहकांचे मोठे नुकसान होत आहे. ते याविषयी बोलताना म्हणाले की, गुगल आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हानी पोहोचवते. तसेच,  त्यामुळे मॅप माय इंडियासारख्या भारतीय स्पर्धकांची गळचेपी होत आहे. 

Google ला अलीकडेच ठोठावला होता दंड 

ऑक्टोबरमध्येच भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) अमेरिकन कंपनी Google वर सुमारे 1 हजार 338 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.  त्यानंतर Google ने या दंड आदेशाला NCLAT मध्ये आव्हान दिले आहे.

मॅप माय इंडियाचे सीईओ रोहन वर्मा म्हणाले की, कोरोनाच्या काळात मॅप माय इंडियाने लोकांना जवळच्या कंटेनमेंट झोन, चाचणी आणि उपचार केंद्रांची माहिती देण्यात मोठी भूमिका बजावली होती.  तर गुगल मॅपमध्ये अशी कोणतीही सुविधा देण्यात आली नव्हती. उलट, गुगलने  आमची सुविधा काढून टाकली होती. म्हणजेच प्ले स्टोअरवरुन app काढून टाकले होते. तसेच, तक्रार केल्यावर मॅप माय इंडिया अॅप प्ले स्टोअरमध्ये परत समाविष्ट करण्यात आले होते.

गुगल स्पर्धाविरोधी कृती करत बाजारात आपली मक्तेदारी कायम ठेवते. अशा परिस्थितीत, Google ला त्याची पर्यायी ऑपरेटिंग सिस्टम, अॅप स्टोअर आणि मॅप सारखे अॅप युजर्समध्ये वाढवणे खूप कठीण होते, असे गुगलवर आरोप करताना म्हटले आहे.

अलीकडेच भारतीय स्पर्धा आयोगाने Google ला स्पर्धा रोखण्यासाठी Android मोबाइल उपकरण क्षेत्रातील आपल्या वर्चस्वाचा गैरवापर केल्याबद्दल सुमारे 1 हजार 338 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.  आपल्या आदेशात, आयोगाने Google ला अनुचित व्यावसायिक क्रियाकलाप थांबवण्याचे आणि काम करण्याची पद्धत बदलण्याचे निर्देश दिले होते.

सीसीआयने 1 हजार 337  कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याच्या आदेशाला गुगलने अपीलीय न्यायाधिकरण NCLAT मध्ये आव्हान दिले आहे. याबाबत पुढे आलेल्या माहितीनुसार, गुगलने सीसीईच्या आदेशावर स्थगिती मागितली आहे. Google ने असे  म्हटले आहे की,  Android ने भारतीय वापरकर्ते, विकासक आणि OEM साठी खूप फायदे मिळवून दिले आहेत आणि भारताच्या डिजिटल परिवर्तनास सक्षम केले आहे.