Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

माझी कन्या भाग्यश्री योजना : जाणून घ्या सर्व माहिती

माझी कन्या भाग्यश्री योजना : जाणून घ्या सर्व माहिती

या योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील जन्मनाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे 21,200 रूपये विम्या अंतर्गत गुंतवले जातात आणि वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 1 लाख रूपये मिळतात.

मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार वाढवणे तसेच मुलांसोबत मुलींचाही जन्मदर वाढविणे, त्यांना शिक्षण देणे, बालविवाहास प्रतिबंध करणे, अशाप्रकारे एकूण मुलींचा सर्वांगिण विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने सरकारने माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुरू केली. महाराष्ट्र सरकारने पूर्वीची सुकन्या योजना विलीन करून त्याऐवजी ही योजना सुरू केली.

माझी कन्या भाग्यश्री योजनेची उद्दिष्ट्ये

  • राज्यातील मुलींच्या शिक्षणात आणि आरोग्यात सुधारणा करणे.
  • मुलींच्या उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे.
  • मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मकता आणणे.
  • बालिका भ्रूणहत्या रोखणे.
  • बालविवाह रोखणे.
  • मुलांप्रमाणेच मुलींचा जन्मदर वाढवणे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे लाभार्थी
माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये 2 प्रकारच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. 
लाभार्थी प्रकार 1 : ज्या दाम्पत्याला एकुलती एक मुलगी आहे आणि आईने कुटुंबनियोजन केले आहे.
लाभार्थी प्रकार 2 : ज्या दाम्पत्याला 1 मुलगी आहे आणि आईने दुसऱ्या मुलीनंतर कुटुंबनियोजन केले आहे. अशावेळी दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. पण एखाद्या दाम्पत्याला 1 मुलगी आणि 1 मुलगा असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

माझी कन्या भाग्यश्री योजने अंतर्गत पूर्वीच्या सुकन्या योजनेचे पुढीलप्रमाणे लाभ कायम ठेवण्यात आले आहेत.

मुलीच्या जन्माबद्दल प्रोत्साहन भेट : एखाद्या दाम्पत्याला पहिली मुलगी झाली आणि त्या दाम्पत्याने त्यानंतर लगेच कुटुंबनियोजन केल्यास घरातील आजी-आजोबांना प्रोत्साहन भेट म्हणून 5 हजार रूपयांचे सोन्याचे नाणे दिले जाते.

मुलीचा जन्मदिन साजरा करणे : मुलीचा जन्म झाल्यानंतर नोंदणी केलेल्या मुलीचा जन्म दिन साजरा करण्यासाठी एकुलती एक मुलगी असलेल्या आणि कुटुंबनियोजन केलेल्या मातेला 5 हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. तर 2 मुली असलेल्या आणि कुटुंबनियोजन केलेल्या मातेला दुसऱ्या मुलीसाठी 2500 रूपयांचे अनुदान दिले जाते.

5 वर्षांपर्यंत मुलींना दर्जेदार पोषण : मुलगी 5 वर्षांची होईपर्यंत तिचे योग्य पद्धतीने पोषण व्हावे यासाठी प्रत्येक वर्षी 2 हजार रूपये याप्रमाणे 5 वर्षांसाठी 10 हजार रूपये पोषणासाठी दिले जातात.

1 ते 5 वी गुणवत्ता पोषण : इयत्ता 1 ते 5वी पर्यंत गुणवत्तापूर्वक पोषण आहारासाठी प्रत्येक वर्षी 2500 यानुसार 5 वर्षांकरीता एका मुलीसाठी 12,500 रूपये, तर दोन मुली असलेल्या आईला 5 वर्षांकरीता 15 हजार रूपये दिले जातात.

6 ते 12वी गुणवत्ता पोषण : माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय टप्प्यातील गुणवत्तापूर्वक पोषण आहारासाठी प्रत्येक वर्षी 3 हजार रूपये यानुसार 7 वर्षांसाठी 21 हजार रूपये, तर दोन मुलींसाठी 22 हजार रूपये दिले जातात.

18 व्या वर्षी कौशल्या विकास : वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली मुलगी अविवाहित असेल तर तिला 18 वर्षांचा विम्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 1 लाख रूपये मिळतात. यातील 10 हजार रूपये मुलीच्या कौशल्य शिक्षणावर खर्च करणे बंधनकारक आहे.

मुलीचा जन्म, गावाचा सन्मान : गावातील मुला-मुलींच्या लिंग गुणोत्तर प्रमाणात मुलींची संख्या वाढावी यासाठी ग्रामपंचायतीला 5 लाख रूपयांचे पारितोषिक दिले जाते.

योजनेच्या अटी आणि शर्ती 

  • सुकन्या योजनेतील मुलींसाठी लागू असलेल्या अटी आणि शर्ती माझी कन्या भाग्यश्री या योजनेत सहभागी करण्यात आल्या आहेत.
  • अर्जदार मुलीचे वडील महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • ही योजना सर्व गटातील दारिद्र्यरेषेखालील तसेच दारिद्र्यरेषेवरील (पांढरे रेशन कार्डधारक) दोन मुली आणि त्यानंतर कुटुंबनियोजन केलेल्यांना लागू असेल.
    विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच तिने इयत्ता 10 वीची परीक्षा उत्तीर्ण होणे आणि १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत अविवाहित असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना बालिकेची जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जर जुळ्या मुली झाल्या, तर या दोन्ही मुली प्रकार दोनच्या लाभार्थी असतील.
  • बालगृहातील अनाथ मुलींसाठी योजना अनुज्ञेय राहील.
  • एखाद्या परिवाराने अनाथ मुली दत्तक घेतले असेल, तर सदर मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. परंतु सदर लाभ प्राप्त होण्यासाठी दत्तक मुलीचे वय ६ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • प्रकार 1 आणि प्रकार 2 अशा दोन्ही लाभार्थी कुटुंबास अपत्यांच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहील.
  • सदर योजनेअंतर्गत १८ वर्षानंतर जी रक्कम रुपये १ लाख मिळणार आहे, त्यापैकी किमान रुपये १०,०००/- हे मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करणे आवश्यक आहे.


आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढीलप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज देण्यात आला आहे. अर्जासोबत अर्जदाराचे आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, पत्ता, मोबाइल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आईचे किंवा मुलीचे बँक खात्याच्या पासबुकची प्रत जोडणे आवश्यक आहे.